मुंबईबाहेरही होणार अभिनयाच्‍या कार्यशाळा - संजीव पलांडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे - मुंबईत शिकायला येणे शक्‍य नसल्याने अनेकांना अभिनयाच्या शिक्षणापासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाच्या कार्यशाळा मुंबईबाहेर पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, रत्नागिरी अशा विविध भागांत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजीव पलांडे यांनी केली.

राज्य नाट्य स्पर्धा आणि राज्य बालनाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरी झाली. पुणे विभागातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या केंद्रांवरील पारितोषिकांचे वितरण झाले. त्या वेळी पलांडे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाची सुरवात केली आहे. त्याच्या कार्यशाळांचे आयोजन मुंबईत केले आहे. मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी अनेकांना मुंबई गाठावी लागत होती. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. मुंबईत या कार्यशाळा सुरू करणे, हा या उपक्रमाचा पहिला टप्पा होता. आता दुसऱ्या टप्प्यात राज्याच्या अन्य भागांतही या कार्यशाळा सुरू करण्याचा निर्णय विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यात तेथील शहरासह ग्रामीण भागातील अभिनयप्रेमींनाही सहभागी होता येईल. या कार्यशाळा सात दिवसांच्या असतील. नाट्यक्षेत्रातील विविध तज्ज्ञ त्यात मार्गदर्शन करतील.

‘सबकुछ बागूबाई’ने जिंकली मने
पुणे विभागीय नाट्यस्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ‘सबकुछ बागूभाई’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. पारितोषिक वितरण केलेल्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. खुमासदार संवादाने रसिकांना खिळवून ठेवले. सचिन सुरेश आणि अमिता खोपकर यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Acting Workshop out of mumbai sanjiv palande