पुणे पोलिस आयुक्तांचा दणका; आणखी दोन टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई

Action against Bandu Andekar and Jayesh Lokhand gang under mcoca act
Action against Bandu Andekar and Jayesh Lokhand gang under mcoca act

पुणे : वर्चस्वाच्या लढाईतून आणि दहशत निर्माण करण्यासाठी शहरातील गुन्हेगारी टोळ्या पुन्हा अॅक्टिव्ह झाल्या आहेत. या टोळ्यांना वचक बसविण्यासाठी पोलिसही सक्रीय झाले आहेत. त्या अनुषंगाने बंडू आंदेकर आणि जयेश लोखंड टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

जयेश लोखंडे टोळी :
जयेश विजय लोखंडे (वय २०, रा. मंगळवार पेठ), निखिल विजय कुसाळकर (वय २२, रा.वडारवाडी), रोहित सुरेश धोत्रे (वय २१, रा. जुनी वडारवाडी), सुबोध अजित सरोदे (वय२०, रा. हेल्थ कॅम्प, पांडवनगर) आणि जितेंद्र संजय जंगम ऊर्फ गोहिरे (वय ३१, रा. पीएमसी कॉलनी, पांडवनगर) अशी मोका कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रिक्षाचालक सनी पवार हे चार जानेवारी रोजी रात्री पाऊण वाजता घराजवळ गाड्या पाहण्यासाठी घराबाहेर आले होते. तेव्हा आठजण त्याठिकाणी आले. त्यांच्या हातात तलवारी, कोयते, गज व काठ्या होत्या. तुझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत, तू एवढे पैसे कमावतो, आम्ही पांडवनगरचे भाई लोक आहे. तू आम्हाला हप्ता का देत नाही, असे म्हणून त्यांनी पवार यांना त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले होते. तसेच पवार यांची रिक्षा, दोन कार, एक दुचाकी तसेच इतरांच्या काही वाहनांची कोयत्याने तोडफोड करून परिसरात दहशत पसरविली होती. या गुन्ह्यात चतु:श्रृंगी पोलिसांनी टोळीप्रमुख जयेश लोखंडेसह पाच जणांना अटक केली.

गजा मारणे मिरवणूक प्रकरण : गुंड समर्थकांचं फोन रेकॉर्ड पोलिस तपासणार

जयेश लोखंडे व त्याच्या साथीदारांनी खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जखमी करून जबरी चोरी, दरोडा, हत्यारे, पिस्तुले बाळगणे, खंडणी मागणे अशी गंभीर गुन्हेगारी कृत्ये सातत्याने केलेली आहेत. सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे.

बंडू आंदेकर टोळी :
शहराच्या मध्यभागात दहशत निर्माण करणा-‍या आंदेकर टोळीवरही (मोक्का अंतर्गत) कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अकरा जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६५, रा. नानापेठ) आणि नंदकुमार बाबूराव नाईक (वय ७२, रा. शुक्रवारपेठ) हे दोघेही उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल झाले आहेत.ऋषभ देवदत्त आंदेकर (वय २२, रा.रास्तापेठ), हितेंद्र विजय यादव (वय ३२), दानिश मुशीर शेख (वय २८), योगेश निवृत्ती डोंगरे (वय २८), विक्रम अशोक शितोळे (वय ३४), अक्षय दशरथ अकोलकर (वय २८), स्वराज ऊर्फ शक्ती निलंजय वाडेकर (वय १९, सर्व रा. नानापेठ), प्रतीक युवराज शिंदे (वय १८, जुना बाजार), यश संजय चव्हाण (वय १९, रा. पर्वती), देविदास ऊर्फ देवा बाळासाहेब गालफांडे (वय २१, रा. विश्रांतवाडी) आणि वैभव नितीन शहापूरकर (वय १९, रा. नानापेठ) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

पिंपरीतील शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुखाचा मुळशीत खून; पुरावे नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न​

या बाबत ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ) याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यापारी पेठ असलेल्या गणेश पेठ, नाना पेठ भागात आंदेकर टोळीची दहशत आहे. कुडले आणि आंदेकर टोळीतील काहीजणांचे वाद होते. कुडले आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने २१ फेब्रुवारी रोजी फिर्यादीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. याप्रकरणी आंदेकरसह गाडी गण्या, सूरज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आंदेकरला मध्यरात्री नाना पेठ भागातून अटक करण्यात आली. अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी अकरा जणांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. बंडू आंदेकर याला फरासखाना पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्यावर कायद्याचा कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळे त्याच्या टोळीला पोलिस कोठडी देण्याची मागणी अॅड. फरगडे यांनी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com