esakal | पुणे : गणेशोत्सवात अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : गणेशोत्सवात अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई

पुणे : गणेशोत्सवात अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात अवैध दारू, ताडी तयार करण्यासाठी मानवी जीविताला घातक विषारी रसायनांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेत राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुध्द संयुक्त मोहीम उघडली आहे. सराईत गुन्हेगारांवर मोकाची कारवाई केल्यानंतर आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारू, हातभट्टी आणि ताडी विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गणेशोत्सव आणि सणासुदीच्या कालावधीत अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईत ताडी तयार करण्यासाठी विषारी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याचे समोर आले. त्यामुळे अशा गुन्हेगारांना चाप बसविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहर पोलिसांच्या मदतीने मोहीम उघडली आहे. या संयुक्त कारवाईत विषारी ताडी विक्रीच्या गुन्ह्यातील चार आरोपींवर नुकतीच मोकाची कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले.

हेही वाचा: राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी MIM खासदार ओवैसींवर गुन्हा

राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस यांच्यात समन्वय ठेवण्यात येत आहे. अवैध दारू धंदे आणि सराईत गुन्हेगारांच्या माहितीचे आदान-प्रदान केले जात आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए आणि हद्दपारीचे गुन्हे दाखल करणे शक्य होणार आहे.

- संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

हेही वाचा: न्यूजक्लिक, न्यूजलाँड्री माध्यमसंस्थांवर आयकर विभागाचा 'सर्व्हे'

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई (एप्रिल ते ऑगस्ट २०२१) :

  • दाखल गुन्हे १ हजार ४३२

  • अटक आरोपी ७५५

  • मुद्देमाल जप्त ४ कोटी ४० लाख रुपये

loading image
go to top