esakal | पिचकारी मारण्यापूर्वी सावधान, असा बसू शकतो झटका...
sakal

बोलून बातमी शोधा

split

सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्यास पाचशे रुपये दंड द्यावा लागेल. याचे सर्व अधिकार ग्रामस्तरावर ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कर्मचारी यांना तसेच नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी यांना दिले आहेत.

पिचकारी मारण्यापूर्वी सावधान, असा बसू शकतो झटका...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : पान खाऊन थुंकणा-यांवर दंडात्मक कारवाईसोबतच बारामतीत 25 पानटपरी चालकांवरही कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली. न्यायालयाने या टपरीचालकांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना सोडून दिले. 

लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क

चेह-यावर मास्क न लावता वावरणा-या तसेच सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणा-या नागरिकांवर आता पाचशे रुपयांच्या दंडाची कारवाई होणार आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच छावणी परिषद हद्दीमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता उभे असलेले व गाडी चालवताना आढळल्यास यापूर्वी पोलिस प्रशासन व बारामती नगरपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचबरोबर आता सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्यास पाचशे रुपये दंड द्यावा लागेल. याचे सर्व अधिकार ग्रामस्तरावर ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कर्मचारी यांना तसेच नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी यांना दिले आहेत.या नियमांचेउल्लंघन करणार्यांवर साथीरोग नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

त्यानुसार बारामतीत पान खाऊन थुंकणा-यांवर दंडात्मक कारवाईसोबतच 25 पानटपरी चालकांवरही कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली. न्यायालयाने या टपरीचालकांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना सोडून दिले.