Wall Poster
Wall PosterSakal

बारामती शहरात विनापरवानगी जाहिराती लावल्यास कारवाई

बारामती शहरातील कोणत्याही भिंतींवर आपल्या व्यवसायाच्या जाहिराती नगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय लावता येणार नाहीत.

बारामती - शहरातील कोणत्याही भिंतींवर आपल्या व्यवसायाच्या जाहिराती नगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय लावता येणार नाहीत. नगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेता कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाहिराती लावणाऱ्या विरुद्ध शहर पोलिस थेट कारवाई करणार आहेत.

याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी माहिती दिली की, बारामती शहरातील सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्यवसायाच्या जाहिरातींचे पोस्टर्स चिटकवून शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे.

Wall Poster
सवाई गंधर्व महोत्सवास ५० टक्के उपस्थितीसह परवानगीची मागणी

वारंवार याबाबत आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. यापुढील काळात बारामती शहरात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स बॅनर्स तसेच कोणत्याही प्रकारच्या जाहिराती नगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय लावल्या, तर त्यांच्याविरुद्ध थेट कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा सुनील महाडीक यांनी दिला आहे.

बारामती शहरात अनेक ठिकाणी अशी पोस्टरबाजी करून शहरातील विविध भागांचे विद्रूपीकरण केले जात आहे, ज्या व्यवसायाची जाहिरात असेल त्या व्यावसायिकांवर देखील यापुढील काळात कारवाई होणार आहे. त्यामुळे अशा पोस्टरबाजीपासून व्यापारी व जाहिरातदारांना सावध राहावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com