कोरनामुक्त असूनही बारामती नगरपालिकेने उचलले हे आदर्श पाऊल

मिलिंद संगई
Monday, 29 June 2020

बारामतीत गेल्या काही दिवसात अपवादात्मक रुग्ण सोडल्यास कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्यामुळे लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवले आहेत.  अशा नागरिकांवर आता  नगरपालिकेने... 

बारामती (पुणे) : बारामती शहर कोरोनामुक्त झालेले असल्याने काहीही धोकाच उरला नाही, अशा भ्रमात राहून मास्कविना फिरणा-या 53 जणांना बारामती नगरपालिकेने दणका देत त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंडाची आकारणी केली. 

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

बारामती नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी आज दिवसभरात शहर पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी जोरदार कारवाई करत मास्कविना बिनधास्त फिरणा-यांकडून दंड वसूल केला. ही कारवाई या पुढेही सुरु राहणार असून, दुकानात नियमांचे पालन न करणा-यांवरही नगरपालिकेचे पथक कारवाई करणार असल्याची माहिती आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे यांनी दिली. 

शिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार

बारामतीत गेल्या काही दिवसात अपवादात्मक रुग्ण सोडल्यास कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्यामुळे लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवले आहेत. अनेक जण बिनधास्त मास्कविना दुचाकीवरुन गावभर हिंडताना दिसतात. अशा नागरिकांवर आता दंडात्मक कारवाईचा बडगा नगरपालिकेने उगारला आहे. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

कोरोनामुक्तीकडे बारामतीची वाटचाल झालेली असली, तरी ही परिस्थिती कायम ठेवण्यासाठी लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याने नगरपालिकेने नाईलाजाने हे पाऊल उचललेले आहे. वारंवार मास्कचा वापर करण्याचे आवाहन करूनही अनेक जण नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत. त्यामुळे या पुढील काळात ही कारवाई कठोर करण्याचेही निर्देश प्रशासनाने दिले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against unmasked citizens in Baramati