देहूत अवैध वाळू उपसाविरोधी कारवाई 

illegal sand mining
illegal sand mining

देहू  : देहूतील इंद्रायणी नदीत अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागाने गुरुवारी (ता. 22) कारवाई केली. या कारवाईअंतर्गत एक जेसीबी, तीन ट्रॅक्‍टर ताब्यात घेऊन देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

दरम्यान, वाळू उपसा करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी गावकामगार तलाठी अतुल गीते यांनी फिर्याद दिली. इंद्रायणी नदी पात्रात नगर जिल्ह्यातील शिरूर व खेड तालुक्‍यातील अनेक वाळू विक्रेते बेकायदा उपसा करत आहेत. हवेली आणि खेड तालुक्‍याच्या हद्दीचा ते फायदा घेत आहे, असे स्थानिकांनी महसूल विभागाला कळविले होते. त्या पार्श्वभूमीवरच पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी शेखर शिंदे, गावकामगार तलाठी अतुल गिते यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे कारवाई केली. त्यात तीन ट्रॅक्‍टर, एक जेसीबी ताब्यात घेतला. तसेच, सात ते आठ ब्रास वाळू जप्त केली. 

वाळू उपसा करणारे पळून गेले असून, संबंधित वाहने देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत, अशी माहिती तलाठी अतुल गीते यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com