लोणीकंद पोलिसांची डीजेवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

कोरेगाव भीमा - लोहगाव रोड, वाघोली येथे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान वापरण्यात आलेला डीजे वाहन लोणीकंद पोलिसांनी साउंड सिस्टिमसह जप्त केले. याबाबत संबंधित गणेश मंडळ व डीजे वाहनाच्या चालक व मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी डीजे बंदीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांवर अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 

गणेशविसर्जन मिरवणुका शांततेत व पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Action on the DJ of Lonikand police