कर बुडविणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

दोनशे कोटींचा गैरव्यवहार; 13 लाख रुपये जप्त
पुणे - केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या दक्षता विभागाने कर बुडविणाऱ्यांवर कारवाई केली असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला आहे. या कारवाईत दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश असलेली सुमारे 13 लाख रुपये रोख रक्कम विभागाने जप्त केली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातील काही कंपन्या या कर चुकवितात, अशी माहिती केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या दक्षता विभागाच्या मुख्यालयास मिळाली होती. त्यानुसार संचालक प्रवीण बाली, वैशाली पतंगे आदी अधिकाऱ्यांनी शनिवारी पुण्यात सहा ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात कंपन्यांतील कागदपत्रे, लॅपटॉप जप्त केले आहेत. या कागदपत्रांच्या पडताळणीतून साधारणपणे वीस कोटी रुपये इतका कर बुडविल्याचे प्राथमिक अंदाजात पुढे आले आहे. एका कंपनीत सुमारे 200 कोटी रुपयांची खोटी बिले आढळून आली आहेत. याचप्रमाणे सुमारे 13 लाख रुपयांचे नवीन चलन मिळून आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवीन चलन आढळून आल्याने याचा जुने चलन बदलून देण्याच्या प्रकारात सहभाग आहे का, याचाही तपास पुढील काळात होणार आहे.

वाहन उत्पादक कंपन्यांना सुटे भाग तयार करून देणाऱ्या या कंपन्या असून, बहुतेक पिंपरी-चिंचवड भागातील आहेत. खोट्या बिलाच्या आधारे कर चुकवेगिरी केली जात असून, आणखी तपासणी केल्यानंतर या कंपन्यांवर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Web Title: action on do not tax depositor