Pune Crime : कल्याणीनगर येथे रुफ टॉपवरील पबवर कारवाई

कल्याणीनगर येथे इमारतीच्या गच्चीवर सुरु अनधिकृतपणे सुरु असलेल्या पबवर महापालिकेने सलग तिसऱ्यांदा कारवाई करून बांधकाम पाडून टाकले.
Pune Crime : कल्याणीनगर येथे रुफ टॉपवरील पबवर कारवाई
sakal

पुणे - कल्याणीनगर येथे इमारतीच्या गच्चीवर सुरु अनधिकृतपणे सुरु असलेल्या पबवर महापालिकेने सलग तिसऱ्यांदा कारवाई करून बांधकाम पाडून टाकले. रस्त्यावरील पार्किंग, रात्र उशिरापर्यंत सुरु असणारा गोंधळ यामुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी केल्यानंतर आज बांधकाम विभागाने कारवाई करून सुमारे १४ हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने वडगाव शेरी येथील सर्वे क्रमांक १३ मध्ये इमारतीच्या गच्चीवर पत्र्याचे सेड मारून तेथे हॉटेल व पब चालविले जात होते. बांधकाम विभागाने एमआरटीपी १९६६ कायद्यातील कलम ५३ नुसार संबंधित हॉटेल व्यावसायिकाला ऑगस्ट २०२२ मध्ये नोटीस बजावली होती.

पण त्यानंतरही पब सुरु राहिल्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये कच्च्या स्वरूपाचे बांधकाम पाडून टाकण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी पब उभारण्यात आल्याने महापालिकेने पुन्हा ऑगस्ट २०२२ मध्ये कारवाई केली. तसेच संबंधित पब चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे पत्र दिलेले आहे.

महापालिकेने यापूर्वी दोन वेळा कारवाई करूनही इमारतीच्या गच्चीवर पुन्हा पत्र्याचे शेड, बांधकाम करून पब सुरु करण्यात आला. त्याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर आज बांधकाम विभागाने पबवर कारवाई करून १४ हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकण्यात आले.

या कारवाईत ६ गॅस कटर, 12 बिगारी, 8 महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान सहभागी झाले होते. तसेच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम निरीक्षक विष्णू तौर, पंकज दोंदे, योगेश गुरव यांनी ही कारवाई केली.

कार्यकारी अभियंता अजित सुर्वे म्हणाले, कल्याणीनगर येथे एका इमारतीच्या गच्चीवर पबवर यापूर्वी दोन वेळेस कारवाई केली होती. पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देऊनही पुन्हा पब सुरु करण्यात आला आहे. हे बांधकाम अनधिकृत आहे, तसेच पबमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पायऱ्यांऐवजी केवळ लिफ्टचाच वापर करता येत होता. हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होते. स्थानिक नागरिकांना रात्री उशिरापर्यंत आवाजाचा, पार्किंगचा त्रास होत असल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

ठरावीक व अर्धवट कारवाई

संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी रुफटॉफ हॉटेल सुरु आहेत, काही नदीपात्रात हरित पट्ट्यात आहेत. पण ठरावीक ठिकाणी कारवाई केली जात आहे. तसेच काही ठिकाणी कारवाई सुरु केल्यानंतर राजकीय दबाव येताच कारवाई अर्धवट सोडून दिली जात आहे. रात्री उशिरापर्यंत चालणारे रुफटॉपवरील हॉटेल, पबमुळे स्थानिक नागरिकांना आवाजाचा, वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आलेल्या आहेत, पण कारवाई केली जात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com