सासवडला विनापरवाना अँटिजेन टेस्ट लॅबवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

सासवडला विनापरवाना अँटिजेन टेस्ट लॅबवर कारवाई

सासवड ः सासवड (ता. पुरंदर) शहरात विनापरवाना कोविड रॅपिड अँटिजेन टेस्ट करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाशी संलग्न पॅथेलाॅजी लॅब सील केली. पुरंदर तालुक्याच्या तहसिलदार रुपाली सरनौबत, पोलीस अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींच्या पथकाने तक्रारीवरुन भेट दिली व तेथील काही रेकार्ड ताब्यात घेत प्राथमिक सीलची कारवाई काल केली. तर उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनाही याबाबत अहवाल तहसिलदारांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी सासवड शहरातच मार्केटयार्ड भागात सीटी स्कॅनसाठी खासगी क्लिनीकमध्ये जादा दर लावल्याचे आढळल्यानंतर संबंधीतांस नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी कारवाई आहे. परंतु, प्रशासनाकडून वैद्यकीय क्षेत्रात सीलद्वारे कारवाईची ही पहीलीच वेळ आहे.

हेही वाचा: लॉकडाउन असूनही पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगार फिरताहेत मोकाट

याबाबत माहिती देताना तहसिलदार रुपाली सरनौबत म्हणाल्या, सासवड शहरातील साळीआळी भागातील डाॅ. रविंद्र कुंभार यांच्या श्री हाॅस्पीटललगत `श्री पॅथेलाॅजी लॅब` आहे. तिथे रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या जात होत्या. त्यासाठी आवश्यक ती शासनाकडील आरोग्य सेवेच्या जिल्हा शल्य चिकीत्सकांची परवानगी नसल्याचे प्रथमदर्शनी आढळले. तसेच उडवाउडवीची व आधांतरी उत्तरे दिली गेली. त्यामुळे या संबंधीत लॅबमधील शासन यंत्रणेच्या परस्परचे विनापरवाना तपासणीचे कर्मचाऱयांमार्फतचे कामकाज थांबावे, यासाठी गुरूवार (ता. 20) सायंकाळीच प्राथमिकदृष्ट्या ही लॅब सील केली. तर आज सासवड - दौंड उपविभागाचे प्रांत तथा उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांना अहवालाद्वारे कारवाईची माहिती दिली. त्यांच्या अधिकारात पुढील कारवाईचे लेखी आदेश निघतील. वैद्यकीय अधिकाऱयांमार्फत व आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त रेकाॅर्ड तपासून पुढील आणखी कारवाई ठरविता येईल. तहसिलदार श्रीमती सरनौबत यांच्यासमवेत भेटीच्या व कारवाईच्या पथकात पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. उज्वला जाधव, शासकीय वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन काशिद आदीही होते. दरम्यान, प्रांत श्री. गायकवाड प्रतिक्रीयेत म्हणाले., तहसिलदारांनी संबंधीत लॅब सील केली आहे. अहवाल पाहून पुढची कारवाही ठरवू.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात रेशनवर २४ हजार टन धान्याचे मोफत वितरण

शासनाच्या आयसीएमआर या अधिकृत वेबसाईटवर प्रत्येक कोविड रुग्णाची नोंद व्हावी, असा नियम आहे. त्यामुळे कोविड रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी कोणत्याही खासगी लॅबला शासनाच्या आरोग्य सेवेच्या जिल्हा शल्य चिकीत्सकांची रितसर परवानगी लागते. ही परवानगी असेल तरच लॅबद्वारे आढळलेल्या कोविड रुग्णांची नोंद वेबसाईटवर होते व आरोग्य यंत्रणेस रुग्णास उपचार, रुग्णाच्या कुटुंबियांची काळजी घेता येते. परीसरातील हायरीस्क रुग्णांचा शोध घेता येतो. तपासणी करता येते. आवश्यक उपचार व प्रतिबंधकात्मक क्षेत्र वा इतर काळजी घेता येते. शासन दप्तरी आकडेवारी नोंदविली जाते. त्यामुळे विनापरवाना अशा कोविड रॅपिड अँटिजेन टेस्ट करताच येत नाही. आरटीपीआर चाचण्यांसाठी सुद्धा खासगी लॅबमध्ये स्वॅब नमुना घेतला, तरी त्या नमुन्यांची तपासणी शासनाच्या किंवा शासन परवानगीधारक लॅबमध्येच होती, त्यातून आयसीएमआर या अधिकृत वेबसाईटवर प्रत्येक कोविड रुग्णाची नोंद होते. त्यामुळे हे नमुने घेण्यास खासगी लॅबला परवानगी आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टला परस्पर परवानगी नाही. आम्हाला तिथे आढळलेले किट्स व प्राप्त माहितीनुसार त्यातून ही कार्यावही आहे.

- डाॅ. नितीन काशिद, वैद्यकीय अधिकारी, शासन ग्रामीण रुग्णालय, सासवड

Web Title: Action On Unlicensed Antigen Test Lab In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus
go to top