केडगावमध्ये एका रोडरोमिओवर कारवाई

crime_logo
crime_logo

केडगाव - केडगाव (ता.दौंड) येथील सुभाष कुल महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रवेशव्दारावर रोडरोमिओ घिरटया घालून मुलींना त्रास देत असल्याची तक्रार थेट यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मोबाईलवर दिली. तक्रारीची तातडीने दखल घेत कारवाई केल्याने शिक्षक व पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बारामती येथील मुलीने केलेल्या आत्महत्येनंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी रोडरोमिओंवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर केडगावातील आजची कारवाई महत्वाची मानली जात आहे. सकाळमधून आज प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे मुलींनी हे धाडस केल्याचे पालकांनी सांगितले.  

अधिक माहिती अशी, सूरज बंडगर यांनी आज दैनिक सकाळमधून रोडरोमिओंकडून त्रास होत असेल तर विद्यार्थिनींनी थेट माझ्या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन करून आपल्या मोबाईल क्रमांक जाहीर केला होता. सकाळमधील ही बातमी वाचून आज सकाळी अकरा वाजता काही मुलींनी श्री.बंडगर यांना महाविद्यालयाच्या गेटवरून दूरध्वनी करून संबंधित रोड रोमिओंचे वर्णन व माहिती दिली. क्राईम मिटींग असल्याने बंडगर पुणे येथे आले 

मात्र त्यांनी मुलींच्या तक्रारींची तातडीने दखल घेत केडगाव पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.  

केडगाव पोलिस चौकीतील हवलदार बापूराव बंडगर, संपत खबाले, संदीप कदम यांनी तातडीने शाळेच्या गेटवर जाऊन रोड रोमिओंना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी चार जण पळून गेले. यावेऴी तुषार रंगनाथ शेलार (वय 22, रा.केडगाव) याला पोलिसांनी पकडले. संबंधित रोडरोमिओंवर मोठ मोठयाने आरडाओरड करणे, सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेला शेलार व पळून गेलेले रोडरोमिओ यांचा तेथील माध्यमिक व महाविद्यालयाशी कोणताही संबंध नसतानाही ते त्या परिसरात घिरटया घालत असल्याचे पोलिसांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com