पुण्यात विनाहेल्मेट दुचाकीधारकांवर कारवाईस सुरवात (व्हिडिओ)

helmet.jpg
helmet.jpg

पुणे : शहरात सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आजपासूनच (ता. २०) हेल्मेटसक्‍ती लागू झाली असून याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसही सुरवात झाली आहे. डेक्कन परिसरात हेल्मेट न वापरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी पहिली कारवाई करण्यात आली. पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचे रखवालदार अशोक जगताप यांच्यावर ही कारवाई झाली.

पहिल्या टप्प्यात शहरातील पोलिसांसह केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर बंधनकारक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक कंपन्या आणि खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर एक जानेवारीपासून सर्व दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्‍ती करण्यात येणार आहे. दरम्यान, पुणेकर नागरी कृती समितीतर्फे विवेक वेलणकर यांनी हेल्मेट सक्तीला विरोध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com