पुण्यात अनधिकृत गणपती विक्री स्टॉलवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

 बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस रस्ता, साई चौक या ठिकाणी अतिक्रमण विभागाकडून रस्त्याच्या कडेला व पदपथावर उभारण्यात आलेल्या गणपती विक्री स्टॉलवर (ता. 12, 13 आणि 14 असे तीन दिवस कारवाई करून एकूण सतरा स्टॉल बंद करण्यात आले. 

बालेवाडी : बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस रस्ता, साई चौक या ठिकाणी अतिक्रमण विभागाकडून रस्त्याच्या कडेला व पदपथावर उभारण्यात आलेल्या गणपती विक्री स्टॉलवर (ता. 12, 13 आणि 14 असे तीन दिवस कारवाई करून एकूण सतरा स्टॉल बंद करण्यात आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आले आहे. कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दिलेल्या 11 जुलै 2020 रोजीच्या परिपत्रकांत  दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश महापालिकेकडून दिले होते. तरीही काही जणांनी या नियमांचे पालन न करता स्टाॅल लावले. यामुळे ही कारवाई कऱण्यात आली. 

दरम्यान, रस्त्याच्या कडेला आणि पदपथावर गणेश मूर्ती विक्री स्टॉलसाठी परवानगी न देता त्याऐवजी महापालिकेच्या मोकळ्या मैदानामध्ये, अँमेनिटी स्पेस येथे उभारणी करून गणेश मूर्तींची विक्रीसाठी परवानगी दिली होती. परंतु तरीही असे न करता स्टॉलधारकांनी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या स्टॉलवरच गणपती विक्री सुरू केली.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव

नागरिकांनी  मूर्ती खरेदी करण्यासाठी रस्त्यावर गर्दी करु नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे या उद्देशाने शहरातील तसेच उपनगरातील सर्व पदपथ व रस्त्याच्या कडेला असलेल्या गणेश मूर्ती स्टॉलवर कारवाई करावी असे आदेश महापौरांनी दिल्याने सलग तीन दिवस बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस रस्ता साईचौक येथे  ही कारवाई करून एकूण सतरा स्टॉल काढून घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे निरीक्षक उमेश नरुले यांनी दिली. कारवाईच्या वेळी हा संवेदनशील विषय असल्यामुळे स्टॉलधारकांना मूर्ती काढून घेऊन स्टॉल खाली करून घेण्यात आले.

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken by Encroachment Department on Ganpati sale stall in Pune