अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर रिक्षांवर पुन्हा कारवाई 

संदिप जगदाळे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

हडपसर :  हडपसर वाहतूक शाखेच्यावतीने नियमांची पायमल्ली करत बेशिस्त अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२३ रिक्षांवर कारवाई करून जप्त करण्यात आल्या. गुरवारी दिवसभर हि कारवाई करण्यात आली. एकाच वेळी एवढया मोठया प्रमाणात कारवाई झाल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शब्बीर सय्यद व पोलिस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर म्हेत्रे ते यांनी दिली.
 
जप्त करण्यात आलेल्या रिक्षांमध्ये स्क्रॅप झालेल्या रिक्षा, गणवेश परिधान न करणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, चालकाच्या आसना शेजारी प्रवासी बसविणे, रिक्षा थांबा नसताना रिक्षा थांबविणे, चालकाकडे बॅच व लायसन्स नसणे, अल्पवयीन रिक्षाचालक, अवैध थांब्यावर रिक्षा थांबवणे, रिक्षाला परमिट नसणे, रस्त्यावर बेशिस्तीने रिक्षा थांबवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करणे, अशा रिक्षांचा समावेश आहे. हि कारवाई हडपसर ते गाडीतळ या दरम्यान करण्यात आली. यापुढे हडपसर परिसरातील सर्व भागातील रस्त्यावर धावणाऱया अवैधरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालक तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना चपराक बसली आहे. सोमवारीच हडपसर वाहतूक शाखा व पोलिस ठाण्याच्यावतीने संयुक्त कारवाई करून ११० रिक्षांवर कारवाई करण्य़ात आली होती. कारवाईत सातत्य राहिल्यास वाहतूकीला अडथळा करणाऱ्या व नियमांची पायमल्ली करणाऱ रिक्षा चालकांवर निश्चीतपणे अंकुश बसेल.
 
Web Title: Action Taken On illegal transport by Police