पुणे : 'एमपीडीए' अंतर्गत दोघांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

पुणे : बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या अंतर्गत महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ दोनमध्ये मागील तीन महिन्यात चार जणांवर "एमपीडीए"अंतर्गत कारवाई करुन त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

यलल्या उर्फ सागर इराप्पा कोळनट्टी (वय 30) व शगुन राजू जोगदंड (वय 24, दोघेही रा. ताडीवाला रस्ता) असे कारवाई केलेल्या आरोपीची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, यापूर्वी गोविंद टाक याच्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी तर लखन जगताप याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिसानी "एमपीडीए"अंतर्गत कारवाई केली आहे. अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.

Web Title: Action taken on two under 'MPDA' in pune