बेकायदा पाणी उपसाविरोधात पाणी पुरवठा विभागाची धडक कारवाई 

pune.jpg
pune.jpg

पुणे : एरंडवणा गावठाण येथील हिमाली सोसायटीत पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेरोड क्षेत्रीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या 30 रो हाऊसेस मधील मोटारी जप्त करण्यात आल्या. पुण्यातील उच्चभ्रू व सुशिक्षित नागरिकांचा रहिवास असलेल्या या सोसायटीमध्ये नळजोडाला वीज पंप लावून पाणी उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे इतर भागातील नागरिकांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. 

पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संतोष लांजेकर यांनी सकाळी केलेल्या कारवाईत साठ मोटारी जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे या सोसायटी मधील बहुतांश रो हाऊस मध्ये अशा प्रकारे पाणी उपसा सुरू होता. 

राजू पलमाटे, संदिप गायकवाड, अमोल दांडगट, माणिक कांबळे,  मिसाळ या कर्मचाऱ्यांतच्या सहकार्याने लांजेकर यांनी ही कारवाई केली. 

लांजेकर म्हणाले की,  सर्व नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे हा आमचा प्रयत्न असतो. परंतु जलवाहीनीला वीज पंप लावून पाणी उपसा करणारांमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. यापुढे आमची कारवाई अधिक तीव्र करणार आहोत 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com