Ravindra Thakur : अभिनेता रविंद्र ठाकूर हे नाव आता झाले ब्रॅण्ड; असा हाेता प्रवास...

रविंद्र ठाकूर याचे शालेय जीवनापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न होते. त्याने अनेक ऑडिशन्स दिल्या.
actor ravindra thakur journey of bollywood celebrity brand advertisement
actor ravindra thakur journey of bollywood celebrity brand advertisementsakal

धायरी : बॉलीवूड एक अशी जागा आहे, जिथे दररोज अनेक लोक अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन येतात. काहींची स्वप्ने पूर्ण होतात, तर काही निराश होऊन घरी परततात. या लोकांच्या गर्दीत अशी काही माणसे असतात.

जी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्य अर्पण करतात, पण हार मानत नाहीत. अभिनेता रविंद्र ठाकूर हे या लोकांपैकी एक. रविंद्र ठाकूरचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अभिनयात हात आजमावण्यापूर्वी  रविंद्र ठाकूर, महाराष्ट्रातील  पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी (नारायणगाव) मध्ये शिकत होता. रविंद्र ठाकूर याचे शालेय जीवनापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न होते. त्याने अनेक ऑडिशन्स दिल्या.

actor ravindra thakur journey of bollywood celebrity brand advertisement
Pune Crime : धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याची पतसंस्थेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या

रविंद्रचा चित्रपट प्रवास कसा सुरू झाला हे पाहणे उत्सुकतेचे आहे. उंच उडण्याची स्वप्ने होती आणि मनात आत्मविश्वास होता, अखेर तो अभिनेता झालाच. यानंतर त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

प्रत्येक चमकणाऱ्या ताऱ्यामागे एक संघर्षाची कथा असते, तशी रवींद्र ठाकूरचीही आहे. रविंद्रने अल्पावधीतच खूप नाव कमावले. आपल्या टॅलेंटने तो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करत आहे. रविंद्र ठाकूरची 'देविक' वेबसिरीज लवकरच दिसणार आहे.

actor ravindra thakur journey of bollywood celebrity brand advertisement
Bollywood Stars : एकेकाळी डिप्रेशनला बळी पडले होते हे बॉलीवूड स्टार

रविंद्रच्या कारकिर्दीची सुरुवात पुण्यातील मॉडेलिंगने झाली. हा टप्पा यशस्वी झाला. हळूहळू तो यशाच्या शिडीवर चढत गेला. अनेक मॉडेलिंग शो आणि मालिका हीट झाल्या. त्याने राज्यस्तरीय पुरस्कार जिंकले. आता रविंद्र कृष्णचंद्र ठाकूर हे नाव ब्रॅण्ड बनले आहे, ज्याला परिचयाची गरज नाही. आता रविंद्र ठाकूर याला मॉडेलिंगचा बादशाह म्हटले जात आहे.

actor ravindra thakur journey of bollywood celebrity brand advertisement
Non Veg Restaurants In Pune : मटण थाळीवर ताव मारायचा असेल तर पुण्यातील ही बेस्ट हॉटेल्स पहाच!

रविंद्र ठाकूर याने बीएस्सी, पत्रकारिता, पीजीडीसीए, एलएलबी, एमबीए पूर्ण केले आहे.रविंद्र ठाकूर याने केलेले चांगले काम पाहून भारत सरकारने त्यांना प्रशस्तीपत्र दिले आहे, याशिवाय रविंद्र ठाकूर यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. युवा प्रताप राज्य कला पुरस्कार,

महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्कार, स्वराज्य चित्रपट निर्मितीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, एस ऑफ इंडिया मिस्टर बेस्ट वॉक, मिस्टर आणि मिस लोणावळा, सांस्कृतिक राजा आणि राणी, सोशल मीडिया नेक्स्ट टॉप मॉडेल यांचा त्यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com