अभिनेत्री सविता मालपेकर उद्या राष्ट्रवादीमध्ये करणार जाहीर प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

अभिनेत्री सविता मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.

पुणे : प्रख्यात चित्रपट अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेणार आहेत. मुंबईच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये  उद्या (ता.९) सकाळी ९:३० वाजता जाहीर प्रवेश करणार आहेत. 

पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस​    

अभिनेत्री सविता मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.

अ.ब.क, हाहाकार, कुंकू लावते माहेरचं, गड्या आपला गाव बरा, स्वामी पब्लिक लिमिटेड, नटसम्राट, मुळशी पॅटर्न, शिकारी, मी शिवाजी पार्क, 7 रोशन व्हिला अशा सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘हथियार’ या हिंदी चित्रपटातही त्या झळकल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सविता मालपेकर सध्या स्टार प्रवाहवरील "मुलगी झाली हो" या मालिकेत खाष्ट सासूची भूमिका साकारत असून तब्बल ७ वर्षांनंतर त्या सासूची भूमिका साकारत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Savita Malpekar will make a public entry in NCP tomorrow