
Rural Development
Sakal
पुणे : एक हजार एकराचे क्षेत्रफळ आणि दीड हजार लोकसंख्या असलेले एक गाव...राज्य शासनाने आवाहन केले आणि संपूर्ण गाव पुढे आले. गावातील पंधरा पाणंद रस्ते खुले केले. जिओ रेफरन्सिंग करून त्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद घेतली. एवढ्यावर न थांबता सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) रस्त्यांचे क्राँकिटीकरण करून दुतर्फा वृक्ष लागवड करीत पुणे जिल्ह्याबरोबरच राज्यासमोर नवा आदर्श निर्माण केला.