अन्‌ त्याने गुटखा सोडला!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे - कॅब चालवतानाही गणेश हा गुटखा खायचा... आयटी कंपनीत काम करणाऱ्या विनायक पटवर्धन यांना ही बाब खटकली. कॅबमधून घरी जाताना ते दररोज गणेशला याचे दुष्परिणाम समजावून सांगत असे. अखेर काही दिवसांनी त्याचे सकारात्मक परिणाम होऊन गणेशने गुटखा सोडला.

त्यानंतर पटवर्धन यांनी आयटी कंपन्यांमध्ये केलेल्या जनजागृतीने अनेकांचे मन परिवर्तन झाले असून, त्यांनी तंबाखू, गुटखा खाणे सोडले आहे.
आयटी कंपनीतील दररोजच्या आठ तासांच्या नोकरीपलीकडे जाऊन सामाजिक कामाची ऊर्मी असणारे पटवर्धन हे गुटखा व तंबाखूच्या दुष्परिणांमाबाबत जनजागृती करीत आहेत. ते खराडीतील एका कंपनीत काम करतात.

कंपन्यांमधील कॅबचालक, सुरक्षारक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखू व गुटखा खाण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर व कालांतराने कुटुंबावर परिणाम होत असल्याचे पटवर्धन यांच्या निदर्शनास आले. यासाठी काही तरी करावे म्हणून त्यांनी ‘लॅण्डमार्क संस्थे’चा स्व-परिवर्तन घडवून आणणारा कोर्स पूर्ण केला आणि त्याअंतर्गत त्यांनी सामाजिक प्रकल्प राबविण्याचे ठरवले. 

याचाच एक भाग म्हणून ‘इटन टेक्‍नॉलॉजीस्‌’ या कंपनीतील ७० कॅबचालक, सुरक्षारक्षक व सफाई कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी कार्यशाळा आयोजित केली. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशकांनी कर्मचाऱ्यांना गुटखा व तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. या कार्यशाळेचा सर्वांवर सकारात्मक परिणाम झाला आणि काहींनी तंबाखू व गुटखा सोडण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर विनायक हे वेगवेगळ्या आयटी कंपन्यांमध्ये जाऊन अशा कार्यशाळा घेत आहेत.

आजही अनेक जण तंबाखू व गुटखा खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत. त्यांना यापासून परावृत्त करण्याची गरज आहे. यासाठीच मी कंपन्यांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीसाठी कार्यशाळा घेत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. 
- विनायक पटवर्धन  

Web Title: Addiction Free Workshop Gutkha Cab Driver Vinayak Patwardhan