व्यसनाधिनतेसारख्या प्रथांना वेळीच आवर घातला पाहीजे - दिलीप वळसे पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

पारगाव ता. आंबेगाव येथे माजी आमदार सहकार महर्षी स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या 20 व्या स्मृतीदिनानिमित्त भीमाशंकर साखर कारखाना व मुक्तादेवी सामुदायिक विवाह सोहळा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल शनिवारी 26 मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पारगाव (पुणे) - सामुदायिक विवाह सोहळ्यातुन पैशाची आणि वेळेची बचत होते परंतु रात्री वरातीवर भरपुर खर्च केले जातात अलिकडच्या काही वर्षात वरातीचे स्वरुप बदलत चालले असुन त्यातुन तरुण व्यसनाधिनतेकडे झुकत चालला असुन अशा प्रथांना वेळीच आवर घातला पाहीजे  असे प्रतीपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.
 
पारगाव ता. आंबेगाव येथे माजी आमदार सहकार महर्षी स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या 20 व्या स्मृतीदिनानिमित्त भीमाशंकर साखर कारखाना व मुक्तादेवी सामुदायिक विवाह सोहळा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल शनिवारी 26 मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वधु वरांना शुभेच्छा देताना श्री. वळसे पाटील बोलत होते. यावेळी माजी सभापती आनंदराव शिंदे, लक्ष्मीकांत खाबिया, पंचायत समिती सदस्य संतोष भोर, भीमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, कार्यालयीन अधिक्षक रामनाथ हिंगे, सरपंच आशा ढोबळे, उपसरपंच भाऊसाहेब ढोबळे, सोनबा ढोबळे, नामदेव पुंडे, रामचंद्र ढोबळे, अनिल वाळुंज, दत्तात्रय वाव्हळ, रामकृष्ण पोंदे, कैलासबुवा काळे उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील पुढे म्हणाले, माजी आमदार दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी आयुष्यभर कामाच्या माध्यमातून राजकारण असो की समाजकारण त्यांनी नेहमी सकारात्मक भुमिका मांडली. त्यामुळे तालुक्यात आमुलाग्र बदल झाला. भीमाशंकर साखर कारखाना नेहमी सर्वांच्या बरोबर राहुन ऊसाचा दर असो की सामाजिक काम यामध्ये आघाडीवर राहीला आहे. सर्वसामान्यांच्या कुटुंबातील विवाह कमी खर्चात व्हावे या सामाजिक भावनेतुन भीमाशंकर कारखान्याने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या स्वरुपात आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे वेळ व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते. परंतु एकीकडे सामुदायिक विवाहातून पैशाची बचत करायची आणि दुसरीकडे रात्री वरातीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करायचे, ही बाब चिंतेची असून या प्रथेला वेळीच थांबवणे गरजेचे आहे. पुरुष व स्त्री जन्मातील तफावत वाढत चालली आहे. 1000 मुलांमागे फक्त 850 मुलींचा जन्म होत आहे. पुरुष स्त्री जन्माची तफावत वाढत आहे तसतसे समाजात वेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. याकरीता सर्वांनी स्त्री जन्माचे स्वागत केले पाहीजे. समानतेची भुमिका घेतली पाहीजे असे सांगितले.

बाजार समीतीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकरचे माजी संचालक शिवाजीराव ढोबळे, जिल्हा दुध संघाचे संचालक दौलत लोखंडे व घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन कुंडलिक ढोबळे व सुरेश ढोबळे यांनी केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Addiction should be stop says dilip valse patil