पुण्याला मिळणार चोवीस तासांचे प्रभारी जिल्हाधिकारी?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यानुसार प्रसाद हे आजपासून पुण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी असणार आहेत. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जारी केले आहेत.

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यानुसार प्रसाद हे आजपासून पुण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी असणार आहेत. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जारी केले आहेत. दरम्यान, नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव आज (ता.१०) सायंकाळपर्यंत निश्र्चित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे  प्रसाद  हे २४ तासांचे जिल्हाधिकारी ठरणार असल्याची चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्याचे मावळते जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. राम यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी त्वरीत रूजू होण्याचे पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राम हे काल पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव पदाचा कार्यभार स्विकारण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. यामुळे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आयुष प्रसाद यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. 

पुण्यात वाळू माफियांच्या टोळीकडून दोन पत्रकारांवर खुनी हल्ला

कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण पुण्यात असताना राम यांनी परिस्थिती सक्षमपणे हाताळली. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. राम हे चार वर्षांसाठी राज्यातून आता प्रतिनियुक्तीवर पंतप्रधान कार्यालयात रुजू होत आहेत. आयुष प्रसाद यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला असला तरी कोरोनाच्या कालावधीत जिल्हाधिकारी पदावर लवकरच नियुक्ती करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी पदासाठी काही नावे चर्चेत असली तरी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

आयुष प्रसाद हे तंत्रज्ञान विषयांतील अभियांत्रिकी पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांनी काही काळ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उच्च पदावर काम केले आहे. त्यांची २०१४ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. युपीएससीमध्ये ते देशात २४ व्या रॅंकने उत्तीर्ण झाले आहेत. याआधी त्यांनी खेडचे प्रांताधिकारी आणि अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. वडिल आयपीएस असून सध्या ते कर्नाटक राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आहेत. त्यांच्या आई भारतीय प्रशासकीय सेवेत असून सध्या त्या केंद्रात  जल संशाधन विभागाच्या सहसचिव आहेत. त्यांच्याकडे गंगा नदी स्वच्छता मिशनची जबाबदारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional charge of the post of Collector to AYUSH Prasad