पुण्यात वाळू माफियांच्या टोळीकडून दोन पत्रकारांवर खुनी हल्ला

डी. के. वळसे-पाटील
Sunday, 9 August 2020

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे हे घोड नदीच्या पात्रात वाळूची शूटिंग करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांवर वाळू माफियांच्या टोळीने खुनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली आहे.

मंचर : श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे हे घोड नदीच्या पात्रात वाळूची शूटिंग करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांवर वाळू माफियांच्या टोळीने खुनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली आहे. प्रफुल्ल मोरे व संतोष सावंत अशी गंभीर जखमी झालेल्या पत्रकारांची नावे असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, दोघांच्याही पाठीवर मारहाणीचे वळ आहेत. या वाळू माफियांनी त्यांना लाथाबुक्या लोखंडी गज व काट्याने मारहाण केली असून, सात ते आठ जण तिथे होते, अशी माहिती समोर आली आहे. दोघांचे कपडे रक्ताने माखलेले असून सावंत यांच्या डाव्या पायला गंभीर जखम झाली आहे.

खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांनी दोन पोलिस पथद्वारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले असून दोन वाळू माफियांना पोलिसांनी गजाआड केले आहे.आंबेगाव जुन्नर विभागाच्या प्रांत अधिकारी रमा जोशी पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन द पत्रकारांची भेट घेतली. जोशी व पोलीस पथक घटनास्थळी गेले आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. आंबेगाव तालुका पत्रकार संघाने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता आंबेगाव, खेड जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी ची बैठक मंचरला होणार आहे. तेथेच आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असे आंबेगाव तालुका पत्रकार संघाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on two journalists by sand mafia gang