खडकवासला प्रकल्पात शहरासाठी यंदा पुरेसा पाणीसाठा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 February 2021

भामा आसखेड धरणातून शहराला २.६४ टीएमसी पाणी मिळणार आहे. परंतु त्यापैकी सध्या निम्मेच पाणी उपलब्ध होत आहे. तसेच, सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्पातून क्षमतेने वापर होत नाही.

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये सध्या २०.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा सुमारे दोन टीएमसीने अधिक असून, शहराला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. 

शहराला सध्या दर महिन्याला सुमारे दीड टीएमसी पाण्याची गरज भासते. जानेवारी महिनाअखेरीस कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महापालिकेला १५ जुलैपर्यंत ९.१८ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी गेल्या महिनाभरात दीड टीएमसी पाण्याचा वापर झाल्यामुळे सुमारे साडेसात टीएमसी पाणी शहरासाठी मिळणार आहे. हे पाणी काटकसरीने वापरल्यास १५ जुलैपर्यंत पुरणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भामा आसखेड धरणातून शहराला २.६४ टीएमसी पाणी मिळणार आहे. परंतु त्यापैकी सध्या निम्मेच पाणी उपलब्ध होत आहे. तसेच, सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्पातून क्षमतेने वापर होत नाही. शहराची लोकसंख्या सुमारे ४१ लाख गृहीत धरून जलसंपदा विभागाने हे नियोजन केले आहे. परंतु महापालिकेने केलेल्या दाव्यानुसार समाविष्ट गावांमुळे शहराची लोकसंख्या ६३ लाखांवर गेली आहे. जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार, भामा आसखेडमधून शहराला जेवढे पाणी दिले जाइल, तेवढे पाणी खडकवासला प्रकल्पातून कपात करण्यात येणार आहे. 

जलसंपदा विभागाने जानेवारीअखेर नियोजनानुसार खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराव्यतिरिक्त दौंड, इंदापूर नगरपालिका आणि ग्रामीण भागातील २२ ग्रामपंचायतींना पिण्यासाठी ०.८५ टीएमसी पाणी दिले जाणार आहे. तर, हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील सिंचनासाठी १०.९० टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. 

मुलाच्या लग्नातील पाहुणचार धनंजय महाडिकांना महागात; तिघांवर गुन्हा दाखल  

धरणातील उपयुक्त पाणीसाठा आजअखेर (टीएमसीमध्ये) : 
टेमघर ०.५१ 
वरसगाव ९.५४ 
पानशेत ९.८८ 
खडकवासला ०.९८ 

खडकवासला प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २०.९१ टीएमसी (७१.७२ टक्के) गतवर्षीचा आजअखेर एकूण पाणीसाठा १९ टीएमसी (६५.१६ टक्के) 

बंटी-बबलीची जोडी, करते घरफोडी; बारामतीत १९ गुन्ह्यांचा भांडाफोड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adequate water storage for the pune city this year at the Khadakwasla project