आढळरावांवर नेतृत्त्वाचा विश्वास कायम; दिली मोठी जबाबदारी

आढळरावांवर नेतृत्त्वाचा विश्वास कायम; दिली मोठी जबाबदारी

मुंबई : शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आज झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारंसघात आढळराव यांचा पराभव झाला. तरी पक्षाने त्यांना उपनेतेपद देऊन संघटनेतील मान कायम ठेवला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या वेळी आढळराव यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे इतर नेते या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com