यंदा 'अधिक मास'वरही कोरोनाचे सावट, जावईबापूंचा हिरमोड!

adhik maas 2020 is Also affected by corona virus
adhik maas 2020 is Also affected by corona virus

सातगाव पठार : अधिकमास म्हटला की, जावई बापूंसाठी एक पर्वणीच असते. यावर्षी 18 सप्टेंबरपासून सुरू होणारा अधिकमास हा कोरोनाच्या सावटाखाली येत असल्याने जावयांच्या या जेवणावळीवर धोंडा पडणार असल्याचे बोलले जात आहे. यावर्षी धोंडे जेवणासह सासरच्या अनेक मानापानाला मुकावे लागणार असल्याने जावई मंडळींच्या आनंदावर विरजणच पडले आहे.

ग्रामीण भागात आजही अधिक मास धोंडयाचा महिना या नावानेच ओळखला जातो. या महिन्यात खासकरून जावयांना धोंडे जेवणासाठी सासुरवाडीत निमंत्रित केले जाते. केवळ जेवणच नाही तर लेक-जावयाला कपड्यांसह एखादी वस्तू भेट दिली जाते. त्यांच्या सोबत अन्य मंडळींनाही निमंत्रित केले जाते. यात नव्या-जुन्या सर्व जावयांचा मान राखला जातो. त्यामुळे धोंडयाच्या महिना जावयांसाठी एक आनंदाची पर्वणीच असतो. मात्र सासरेबुवांसाठी एक कसोटीचा क्षणच असतो. 

हे वाचा - पुण्याचा चिराग फलोर "जेईई'मध्ये देशात बारावा; दिल्ली एनसीटीमध्ये प्रथम

यावर्षी 18 सप्टेंबरपासून अधिक अश्विनच्या रूपात अधिक मासास प्रारंभ होत असून तो 16 ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे अश्विन महिन्यांतील घटस्थापनेसह दसरा व पुढे येणारे सर्व सण जवळपास महिनाभर पुढे लांबणार आहे. दरम्यान हिंदू धर्मात या महिन्यात अनेक धार्मिक व्रत वैकल्यांचे महत्व आहे. परंतु कोरोनामुळे अनेक मंदिरे बंद असल्याने अनेकांना घरातच हे विधी पार पाडावे लागणार आहेत. एकंदरच यावर्षी अधिक मासावर कोरोनाचे सावट असल तरी आशातही अनेक जण जावई-लेकीसाठी धोंडे जेवणाची तजवीज करताना दिसत आहेत.

 मराठी शके कालगणना ही चांद्रवर्षावर आधारित असल्याने या कालगणनेत वर्ष 355 दिवसांचे असते. शिवाय इंग्रजी कालगणनेतील सौरवर्ष हे 365 दिवसांचे असल्याने या दोन्ही कालगणनेत वर्षाला 10 दिवसांचा फरक पडतो. मराठी वर्ष व इंगजी वर्ष समान ऋतूत चालावे म्हणून दर तीन वर्षांनी 30 दिवसांचा पडलेला हा फरक एका अधिक मासाने भरून काढला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com