

Hinjewadi Infrastructure Issues Spark Protest As Aditya Thackeray Questions Tax Collection And Lack Of Basic Facilities
sakal
हिंजवडी: वर्षानुवर्षे वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या आयटी कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी रविवारी ‘स्मार्ट आयटी सिटी संकल्प मूक मोर्चा’ काढत प्रशासनाला जाब विचारला. यात आयटीयन्स, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांचा सहभाग राहिला.