esakal | बारामतीकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी हे माहिती असूद्या...प्रशासनाने घातलेत हे निर्बंध... 
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची प्रशासनाला गरज आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर बारामती शहरात तुफान गर्दी उसळली होती. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता पुन्हा एकदा शहरातील व्यवहार...

बारामतीकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी हे माहिती असूद्या...प्रशासनाने घातलेत हे निर्बंध... 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे आज स्पष्ट झाल्यानंतर आता बारामतीतील व्यवहारांवर पुन्हा निर्बंध आणण्याचा निर्णय प्रशासानाने घेतला आहे. उद्यापासून सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच व्यवहार सुरु ठेवण्यास परवागनी दिली जाणार आहे. 

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर प्रशासनाने सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. आज एकाच दिवशी तीन रुग्ण आढळून आल्याने आता पुन्हा एकदा गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने कडक निर्बंध घालण्यासह प्रशासनाने ठोस पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आज बारामतीत घेतलेल्या बैठकीत स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, ही साखळी तुटेल या साठी प्रयत्न करावेत, व्यवहार संध्याकाळी पाचपर्यंत सुरु ठेवावेत, याबाबत त्यांनी सूचना दिल्या. 

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ

स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची प्रशासनाला गरज आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर शहरात तुफान गर्दी उसळली होती. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता पुन्हा एकदा शहरातील व्यवहार सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याच महत्वाच निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे बंधन कायमच राहणार आहे. संध्याकाळी शहरात होणारी मोठी गर्दी व विनाकारण फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेण्यासह काही निर्बंध लागू होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.