तब्बल चौदा दिवसांनंतर 'जम्बो'तील सुविधांसाठी प्रशासनाच्या वेगवान हालचाली

jumbo.jpg
jumbo.jpg
Updated on

पुणे : अत्यवस्थ रुग्णांना मोफत ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्‍शन आणि गरजेनुसार इतर औषधे, अन्य आजाराच्या रुग्णांना आवश्‍यक ते उपचार, सकस आहार, तीन कार्डियाक रुग्णवाहिका, शववाहिनी... हे रुग्णांसाठी; तर डॉक्‍टरांना घरातून ने-आण करण्यासाठी मोटारी अन वेटिंग रूम... या सुविधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील नव्हे तर नियोजनात फसलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या सुविधा सेंटरचे उद्‌घाटन झाल्यानंतर लगेचच देणे गरजेचे असताना प्रशासनाने मात्र त्यासाठी तब्बल १४ दिवसांनंतर हालचाली सुरू केल्या. 
गरीब आणि गरजू रुग्णांच्या सोयीसाठी उभारलेल्या ‘जम्बो’तील बेजबाबदारपणाने अनेक रुग्णांचा जीव घेतला; तर अत्यवस्थ रुग्ण उपचाराविना पडून राहिले. त्यावर जम्बोच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या ‘लाइफलाइन’वर कारवाईचा बडगा उगारूनही सेवा-सुविधांमध्ये बदल न झाल्याने अखेर विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी सायंकाळी ‘जम्बो’ ताब्यात घेतले.

त्याचवेळी मनुष्यबळ आणि अत्यावश्‍यक बाबी पुरवून ‘जम्बो’तील व्यवस्था बदलली. त्यापलीकडे जाऊन शनिवारी रुग्णांना दाखल करून घेणे, उपचार सुरू असलेल्या रुग्णांना बरे करणे आणि अत्यवस्थ रुग्णांचा जीव वाचविण्याचे उपाय केले. अर्थात औषधांचा पुरवठा, रुग्णांना गरजेनुसार इतरत्र हलविणे किंवा त्यांना घरातून आणण्यासाठी कार्डिऑक रुग्णवाहिकाही आणल्या. तसेच, नियोजनाअभावी गोंधळलेल्या डॉक्‍टर, नर्ससाठी नवनव्या सुविधा पुरविल्या. दरम्यान, ‘जम्बो’तील गोंधळाकडे ‘सकाळ’ने सतत लक्ष वेधले होते. तसेच, रुग्णांच्या असुविधेवर प्रकाशझोतही टाकला होता. त्यामुळे रुग्णांना उपचार देण्यासाठी प्रशासनाची पाऊले पडत आहेत. 

‘जम्बो’तील सर्व व्यवस्था बदलली आहे. त्यामुळे रुग्णांना सहज उपचार मिळतील. त्यातून त्यांना बरे करणे आणि मृत्युदर पूर्णपणे रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर उपाय करण्यात आले आहेत. मात्र, 
आता रुग्णांच्या नातेवाइकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
- रुबल अग्रवाल,  अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत उपचार 
‘जम्बो’त आजघडीला जवळपास ३०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील बहुतेकांना अन्य आजार आहेत. उपचारादरम्यान रुग्णांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्व रुग्णांची ‘मेडिकल हिस्ट्री’ जाणून घेत त्यांच्यावरील नेमक्‍या उपचारांसाठीही यंत्रणा उभारली आहे. त्यासाठी रुग्णांच्या तपासण्या करून त्यांना तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत उपचार पुरविले जाणार आहेत, असे ‘जम्बो’चे नवे समन्वयक राजेंद्र मुठे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com