बारामतीच्या मेडिकल काॅलेजमध्ये मिळणार या सुविधा 

मिलिंद संगई
Wednesday, 24 June 2020

सिटी स्कॅन व एम.आर.आय. सिस्टिमच्या खरेदीसाठी आज 26 कोटी रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

बारामती (पुणे) : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयासाठी सिटी स्कॅन व एम.आर.आय. सिस्टिमच्या खरेदीसाठी आज 26 कोटी रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये सिटी स्कॅनसाठी 8 कोटी, एमआरआय मशीनसाठी 12 कोटी, तर सी.एस.एस.डी. (सेंट्रल स्टरलाईज सिस्टीम डिपार्टमेंट) साधनसामग्रीसाठी सहा कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली गेली.

पुणे जिल्ह्यातील हे शहर तीन दिवसांसाठी सील

बारामतीच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे महत्वाचे आहे. पाचशे खाटांच्या क्षमतेचे 12 मोड्युलर ऑपरेशन थिएटर्स असलेले अत्यंत अत्याधुनिक सुविधा असलेले व शासकीय दरात रुग्णावर उपचार होणारे हे रुग्णालय असल्याने अनेकांना या रुग्णालयाचा फायदा होणार आहे. 

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनीही कसली कंबर

शासकीय दराने सिटी स्कॅन व एम.आर.आयची सुविधा येथे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे केवळ बारामतीच नाही, तर पंचक्रोशीतील रुग्णांना अल्प दरात या सुविधांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजयकुमार तांबे यांनी दिली.

सकाळमुळे वेटलिफ्टर खेळाडू सारिका शिनगारे हिला मिळाला मदतीचा हात

उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य सचिव डॉ. संजय मुखर्जी, संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. सामान्यांना या यंत्रणेमुळे आर्थिक दिलासा प्राप्त होण्यास मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrative approval for Rs. 26 crore for Government Medical College at Baramati