

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेतील एक वरिष्ठ अधिकारी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप देत आहेत. तर महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांना दुजाभाव करत आहेत. त्यांच्यासोबत बोलताना सन्मानाने वागवले जात नाही अशी गंभीर तक्रार उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. त्यामुळे प्रशासनातील वाद चव्हाट्यावर आला आहे.