esakal | बारामतीत पाच ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

pop.jpg

होळ (ता. बारामती) येथे फटाके फोडून प्रशासक निवड निर्णयाचे स्वागत.

बारामतीत पाच ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती; वाचा सविस्तर

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आधी ग्रामपंचायत प्रशासनाचा कालावधी संपला, तेवढ्यात प्रशासक निवडीचा तिढा सुटला. यामुळे विद्यमान सरपंचांचा झेंडावंदनाचा मान हुकला आहे.

हेही वाचा : सुशांतची एक्स गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप, अंकितानं दिलं 'असं' सडेतोड प्रतिउत्तर

बारामती तालुक्यातील होळ, कोऱ्हाळे बुद्रुक, सस्तेवाडी, सदोबाचिवाडी आणि थोपटेवाडी या पाच गावातील ग्रामपंचायतीची मुदत १३ ऑगस्ट रोजी संपली. बरेच दिवस प्रशासक पदाचा चाललेल्या वादावर कोर्टाच्या निर्णयामुळे पडदा पडला.

निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करत जिल्हा परिषदांनी तातडीने प्रशासक नेमण्याची लगबग सुरू केली. बारामती तालुक्यातील मुदत संपलेल्या होळ येथे कृषि विभागाचे विस्तार अधिकारी एस. बी. तावरे, कोऱ्हाळे व सस्तेवाडीचा कार्यभार विस्तार अधिकारी (पंचायत) डी. डी. खंडाळे यांच्याकडे, सदोबाचीवाडीचा कारभार विस्तार अधिकारी (सांख्यिकी) एस. एस. मारकड यांच्याकडे तर थोपटेवाडीचा कारभार विस्तार अधिकारी (कृषी) सुनील गायकवाड यांच्याकडे प्रशासक पदाचा कारभार सोपवण्यात आला.

महत्त्वाची बातमी : मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरू? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर

नेमणुकीच्या ठिकाणी हजर होत  १४ ऑगस्टला सर्वांनी कारभार हाती घेतला. गाव पातळीवर ग्रामपंचायत वरील झेंडावंदनाचा मान प्रतिष्ठेचा समजला जातो. कोरोनाच्या संकटामुळे विद्यमान सदस्य मंडळाला मुदत वाढवून मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रशासक पदाचा वाद कोर्टापर्यंत गेल्यामुळे लवकर मिटणार नाही अशा मानसिकतेत पुढारी होते. पण स्वातंत्रदिनाच्या अगोदर प्रशासकाचा तिढा सुटला आणि मुदत संपलेल्या ग्रामपंचायती वरील सरपंचांचा झेंडावंदनाचा मान हुकला. आता गावांचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे. दरम्यान होळ (ता. बारामती) येथे प्रशासक निवडीच्या निर्णयाचे स्वागत ग्रामस्थांनी फटाके फोडून केले. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)