औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमता वाढणार

औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित संस्थेतील नवीन अभ्यासक्रम आणि सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यासाठी भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया- पीसीआय) परवानगी दिली आहे.
Admission
AdmissionSakal

पुणे - औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) (Pharmacy) अभ्यासक्रमाच्या (Syllabus) विनाअनुदानित संस्थेतील नवीन अभ्यासक्रम आणि सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश (Admission) क्षमतेत वाढ करण्यासाठी भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया- पीसीआय) परवानगी (Permission) दिली आहे. त्यामुळे राज्यातील काही महाविद्यालयांमध्ये नव्याने अभ्यासक्रम सुरू होणार असून काही महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमतेत वाढ होणार असून विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेशाच्या जवळपास चार हजार २०० हुन अधिक जागा वाढणार आहेत. (Admission Capacity of Pharmacology Courses will Increase)

कोरोनासारख्या संकट काळात डॉक्टर आणि त्या पाठोपाठ ‘फार्मसिस्ट’ची सगळ्यात जास्त गरज भासली. म्हणूनच यंदा ‘फार्मसिस्ट’ घडविणाऱ्या तसेच औषधांचे संशोधन, उत्पादन आणि विक्री करण्यापासून ते रुग्णास सुयोग्य औषध पोचविण्यापर्यतचे शिक्षण आणि कौशल्य प्राप्त होणाऱ्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांला मोठी मागणी होऊ लागली आहे. त्यामुळेच राज्यातील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमतेत यंदा वाढ झाल्याचे दिसून येते.

Admission
डोंगरांचा विध्वंस थांबवा अन्यथा आणखी मोठ्या घटना घडतील - माधव गाडगीळ

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून राज्यातील विद्यमान औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित संस्थेतील नवीन अभ्यासक्रम आणि सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला परिषदेने मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे राज्यातील विनाअनुदानित संस्थेतील औषधनिर्माणशास्त्राच्या पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ झाली आहे.

देशातील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांची संख्या आणि प्रवेश क्षमता -

अभ्यासक्रम महाविद्यालयांची संख्या (अंदाजे) प्रवेश क्षमता (सुमारे)

डी.फार्म ३,१५० १.९० लाख

बी.फार्म २,२४८ १.६७ लाख

फार्म.डी २७१ ८,१३०

एम.फार्म ८५० २६,८५०

बी. फार्म प्रॅक्टिस ३५ १,४२०

राज्यातील विनाअनुदानित संस्थेतील ‘पीसीआय’ची मान्यता मिळालेल्या प्रवेशाच्या जागा -

अभ्यासक्रम :  प्रवेश क्षमता (सुमारे)

एम.फार्म : ४४३

बी. फार्म : ३,७००

फार्म.डी : ७०

Admission
मोडून पडला संसार,आता वेळ पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची!

‘कोरोनाच्या काळात डॉक्टरांबरोबरच फार्मसिस्टची गरज जास्त जाणवली. त्यामुळे औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवले. देशातील सर्वात जास्त फार्मसी महाविद्यालय असणाऱ्या जिल्ह्यांपैकी पुणे एक आहे. पुणे जिल्ह्यात ५४ डी.फार्म, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रात ७३ बी.फार्म महाविद्यालये आहेत. जवळपास प्रत्येक महाविद्यालयात एम.फार्म आणि संशोधनाची सोय उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ झाल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे.’’

- डॉ. आत्माराम पवार, प्राचार्य, पूना कॉलेज ऑफ फार्मसी, भारती (अभिमत) विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com