प्रवेशाची माहिती पुस्तिका उद्यापासून केंद्रांवर उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पुणे - अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मार्गदर्शन आणि झोननिहाय केंद्रे निश्‍चित केली आहेत. 

या प्रक्रियेची माहिती पुस्तिका गुरुवारपासून (ता. २५) विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संकेतस्थळावर लॉग इन करून ऑनलाइन अर्जाचा पहिला भाग भरता येईल.
 
झोननिहाय मार्गदर्शन केंद्रे
पुणे शहर विभाग : नूमवि मुलांचे विद्यालय, स. प. महाविद्यालय, शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, एस. व्ही. युनियन कनिष्ठ महाविद्यालय ही मदतकेंद्रे असतील. 

कर्वेनगर : एसएनडीटी कला व वाणिज्य महिला महाविद्यालय आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय. 

पर्वती, धनकवडी, स्वारगेट : श्री शाहू मंदिर महाविद्यालय, कर्मवीर भाऊसाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालय, मोलेदिना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. 

सिंहगड रस्ता : वसंतराव सखाराम सणस उच्च माध्यमिक विद्यालय, रावसाहेब पटवर्धन उच्च माध्यमिक विद्यालय.

कॅम्प-येरवडा : पूना कॉलेज, नौरोसजी वाडिया महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय. 

हडपसर : साधना विद्यालय व रा. रा. शिंदे कनिष्ठ महाविद्यालय आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालय. 

शिवाजीनगर, औंध, पाषाण : फर्ग्युसन महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज महाविद्यालय, बी. आर. घोलप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि आलेगावकर हायस्कूल व सी. के. गोयल कनिष्ठ महाविद्यालय.

पिंपरी-भोसरी : नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय.

चिंचवड-निगडी : श्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय आणि श्रीमती ताराबाई मुथा ज्युनिअर कॉलेज ही मार्गदर्शन केंद्रे असतील. 
अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे 

आर. सी. एम. गुजराथी ज्युनिअर कॉलेज, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, मुक्‍तांगण ज्युनिअर कॉलेज, सिंहगड कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स (आंबेगाव ब्रुदुक), सेंट मीराज्‌ कॉलेज फॉर गर्ल्स, सेंट पॅट्रिक्‍स ज्युनिअर कॉलेज, सिंबायोसिस ज्युनिअर कॉलेज, भारतीय जैन संघटनेचे सेकंडरी स्कूल (संत तुकारामनगर), प्रेरणा उच्च माध्यमिक विद्यालय (निगडी प्राधिकरण).

स्थलांतर प्रमाणपत्र सक्तीचे 
पुणे जिल्हा व्यतिरिक्त अन्य जिल्हा किंवा महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांना पुण्यात प्रवेश घ्यायचा असेल, तर शाळा सोडल्याच्या मूळ दाखल्याच्या पाठीमागे संबंधित जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची सही आणि शिक्‍का असणे बंधनकारक आहे. तसेच अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र (मायग्रेशन) सक्तीचे आहे.

Web Title: admission information book available on center