esakal | पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) तंत्रज्ञान विभागातर्फे (Technology Department) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया (Admission Process) जाहीर करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन (Online) प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना (Student) १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.या अंतर्गत ‘बी.एस्सी इन थ्रीडी ॲनिमेशन ॲण्ड व्हीएफएक्स’ अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ही १०० गुणांची आणि बहुपर्यायी प्रश्नांची असणार आहे. (Admission Process of Technology Department of Pune University Started)

यात संबंधित विषयातील प्रश्नांसाठी ८० गुण, तर सामान्य ज्ञानावर आधारित २० गुणांचे प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे. याबरोबरच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट ॲण्ड फार्माकोव्हिजिलन्स, पोस्ट ग्रॅज्युएट इन डेटा सायन्स ॲण्ड एआय, सर्टिफिकेट कोर्स इन प्रोफेशनल थ्रीडी ॲनिमेशन ॲण्ड व्हीएफएक्स, सर्टिफिकेट कोर्स इन प्रॉडक्शन युआय डिझाइन, सर्टिफिकेट कोर्स इन प्रोफेशनल व्हिज्युअल इफेक्ट्स, सर्टिफिकेट कोर्स इन प्रॉडक्शन ग्राफिक्स डिझाइन अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा: लॉकडॉऊनमुळे होम अ‍ॅप्लायन्सेसची मागणी वाढली

प्रवेश परीक्षेचा तपशील

- प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : १७ जुलै

- विलंब शुल्कासह प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदत : २४ जुलै

- परीक्षेचा कालावधी : एक तास

- प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी लिंक : https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx

loading image