पुणे विद्यापीठात Foreign Languageसाठी अ‍ॅडमिशनला सुरूवात

फ्रेंच, जर्मन, जपानी, रशियन, स्पॅनिश या भाषांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या अर्धवेळ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू
पुणे विद्यापीठात Foreign Languageसाठी अ‍ॅडमिशनला सुरूवात

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातर्फे फ्रेंच, जर्मन, जपानी, रशियन, स्पॅनिश या भाषांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या अर्धवेळ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सात जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.(Admission to foreign language course begins in pune university)

प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक गुणवत्तेनुसार गुणवत्ता यादी आणि आरक्षणाचे सर्व नियम पाळून राबविली जाणार आहे. दरम्यान एखादी भाषा शिकू इच्छिणाऱ्यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी अर्ज भरताना पर्यायी भाषेची पसंती निवडून ठेवायची असते. पहिल्या पसंतीच्या भाषेतील प्रवेशाच्या जागा संपल्यास तुमचे नाव गुणवत्ता यादीत येऊ शकणार नाही. परंतु तुम्हाला पर्यायी भाषेबाबत ई-मेल पाठवून पुन्हा एकदा तुमची संमती घेऊन दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या भाषेसाठी प्रवेश देण्यात येईल. अशावेळी नव्याने वेगळे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाच्या अर्धवेळ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी ‘https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परकीय भाषा विभागाने केले आहे.

हे लक्षात ठेवा

अध्यापन कालावधी : १ ऑगस्ट २०२१ ते ३१ मार्च २०२२ (आठवड्यातून तीन दिवस); दररोज दोन तास. शनिवारी आणि रविवारी होणारी बॅच तीन तासांची असेल. परीक्षा एप्रिल २०२२मध्ये होईल.

२. अर्ध वर्षीय जलद अभ्यासक्रम :

अध्यापन कालावधी : १ ऑगस्ट ते ११ डिसेंबर २०२१; आठवड्यातून पाच दिवस, दररोज दोन तास, परीक्षा डिसेंबर २०२१मध्ये होईल.

महत्त्वाच्या तारखा

  • तपशील : तारखा- प्रवेश अर्ज भरणे : ७ जुलै २०२१

  • पहिली गुणवत्ता यादी : १३ जुलै

  • पहिल्या यादीतील उमेदवारांची शुल्क भरून प्रवेश निश्चिती करणे : १४ ते १८ जुलै

  • दुसरी गुणवत्ता यादी : २० जुलै

  • दुसऱ्या यादीतील उमेदवारांची शुल्क भरून प्रवेश निश्चिती करणे : २० ते २३ जुलै- तिसरी गुणवत्ता यादी : २४ जुलै

  • यादीतील उमेदवारांची शुल्क भरून प्रवेश निश्चिती करणे : २४ ते २६ जुलै २०२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com