सावधान, दिवाळीतील मिठाई भेसळयुक्त असू शकते; वाचा सविस्तर बातमी

adulterated sweets seized in Pune district Indapur
adulterated sweets seized in Pune district Indapur

पुणे : दिवाळीच्या निमित्ताने नातेवाईक मित्रांना मोठ्या प्रमाणावर भेट वस्तू दिल्या जातात. त्यात तयार मिठाईलाही पसंती दिली जाते. पण, ही मिठाई भेसळयुक्त असू शकते. पुण्यात अशी भेसळयुक्त मिठाई मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहे.

दिवाळीनिमित्त बाजारात विक्रीसाठी येणारी साडेपाचशे किलो भेसळयुक्त बर्फी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथून जप्त केली. या बर्फीचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. निमगाव केतकी येथे महेश भरत फुटाणे यांच्या मालकीच्या शुभम मिल्क प्रॉडक्‍ट्‌समध्ये भेसळयुक्त बर्फीचे उत्पादन करण्यात येत होते. याची माहिती "एफडीए'ला मिळाली. त्या आधारावर प्रशासनाने या कंपनीवर शुक्रवारी छापा टाकला. या कंपनीत दूध किंवा खव्यापासून बर्फी तयार न करता रिफाइंड सूर्यफूल, वनस्पती तेल व स्कीम्ड मिल्क पावडरमध्ये साखर टाकून भेसळयुक्त बर्फी तयार केल्याचे आढळले, अशी माहिती "एफडीए'चे सहआयुक्त बा. म. ठाकूर यांनी दिली.

या कंपनीतून 545 किलो बर्फी जप्त करण्यात आली आहे. तिची बाजारातील किंमत 81 हजार 750 रुपये आहे. या बर्फीचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत बर्फीचे उत्पादन बंद ठेवण्याची सूचना कंपनीला केली आहे, असे ठाकूर त्यांनी नमूद केले. ही कारवाई सहआयुक्त संपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अर्जुन भुजबळ आणि अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी अंकुश यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com