युवा विकासाचे दिशादर्शी नेतृत्व : ॲड. राहुल विनायक म्हस्के-पाटील

Rahul-Mhaske-Patil
Rahul-Mhaske-Patil

प्रज्ञावंत वकील, ‘एनएसयुआय’ विद्यार्थी संघटनेत केलेली प्रशंसनीय कामगिरी आणि अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य, युवक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, लैंगिक हिंसाचाराविरोधात जनजागृती, व्यसनमुक्ती आदी क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे ॲड. राहुल विनायक म्हस्के-पाटील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पुण्यातील महाविद्यालयांसाठी स्पेशल अँटी रॅगिंग सेल स्थापण्यात ॲड. म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता. त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला. विद्यापीठाचे बजेट ऑनलाइन प्रसिद्ध करून त्यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी म्हस्के यांनी लढा उभारला. परराज्यातून विशेषतः नॉर्थईस्ट राज्यातून आलेल्या विद्यार्थ्याच्या विविध समस्यांची सोडवणूक केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थिनींची वाढती छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांनी मोहीम आखावी यासाठी धरलेल्या आग्रहामुळे विशेष पथके नेमली गेली. त्याचे चांगले परिणाम झाले. शहरातील अनधिकृत पब, हुक्का पार्लर यांच्या विरोधात आवाज उठवत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी उपक्रम राबवले. युवा कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यासारखी पदे आपल्या कार्याच्या बळावर मिळवली.

महाराष्ट्र प्रदेश पुरोगामी विद्यार्थी व युवक संघर्ष समितीच्या माध्यमातून युवा विकासाचे काम ॲड. म्हस्के करत आहेत. भगवान श्रीकृष्णाचा सामाजिकतेचा संदेश लक्षात घेऊन ॲड. म्हस्के यांनी कोथरुडमध्ये १९९९मध्ये अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टची स्थापना केली. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना दहीहंडीच्या दिवशी कोथरुड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आत्महत्याग्रस्त, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्तांना मदतीचा हात, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, व्यसनमुक्ती उपक्रम, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात.

वयाच्या अठराव्या वर्षापासून सामाजिक न्यायासाठी विद्यार्थी चळवळीत सक्रिय झालेल्या ॲड. राहुल विनायक म्हस्के-पाटील यांनी जी सकारात्मक आंदोलने व उपक्रम राबवले त्याचा लाभ हजारो विद्यार्थी घेत आहेत. विद्यार्थी सुरक्षितता, लैंगिक हिंसाचार कायद्याविषयी जनजागृती, गरजूंना मोफत कायदेशीर सल्ला साहाय्य देण्याचे काम ॲड. म्हस्के करत आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com