esakal | पुण्याचं नाव संभाजीनगर करा; इतिहासाचा दाखला देत, प्रकाश आंबेडकरांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

prakash ambedkar

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची चर्चा बाजूला राहिली असून पुण्याच्या नामांतराने राजकीय वातावरण तापलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं अशी मागणी केली आहे.

पुण्याचं नाव संभाजीनगर करा; इतिहासाचा दाखला देत, प्रकाश आंबेडकरांची मागणी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - सध्या राज्यात नामांतराचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. त्यातच पुण्याचे नावही बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली होती. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची चर्चा बाजूला राहिली असून पुण्याच्या नामांतराने राजकीय वातावरण तापलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं अशी मागणी केली आहे. त्यात त्यांनी ऐतिहासिक घटनांचा दाखला दिला आहे.

भाजपने औंरगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच नामांतराचा मुद्दा पुढे आणला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करणे हा अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचं म्हटलं. तर औरंगाबला संभाजीनगर नाव देण्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. 

हे वाचा - पुण्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव; ब्रिटनहून आलेला एक जण पॉझिटिव्ह

प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, औरंगाबाद नाही तर पुण्याला संभाजी महाराजांचे नाव द्या. पाच वर्षे सरकारमध्ये असताना भाजप-शिवसेनेनं औरंगाबादचं नाव का बदललं नाही? हे स्पष्ट करावं. औरंगाबाद हे एक ऐतिहासिक शहर असून मुघलांच्या काळात ही राजधानी होती. ते ऐतिहासिक रहायला हवं. 

 Video: 'हाफ चड्डी घालून नागपूरात खोटी भाषणं करणं हा राष्ट्रवाद नाही'; सचिन पायलट यांनी डागली तोफ

संभाजी महाराजांवर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झाले आहेत. पुणे जिल्ह्यात वडूज इथं त्यांची समाधी आहे. संभाजी महाराजांची आठवण रहावी असं वाटत असेल तर योग्य भूमी पुणे आहे. म्हणूनच पुण्याला संभाजी महाराजांचे नाव देणं अधिक योग्य होईल असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 

loading image