जेजुरीत उभारले अवकाश निरीक्षण केंद्र 

jejuri sky
jejuri sky

जेजुरी (पुणे) : येथील गुरुकुल इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयामध्ये लायन्स क्लबच्या पुढाकाराने अवकाश निरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शाळा व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणातून संशोधनवृत्ती वाढविण्याची व जोपासण्याची संधी या केंद्रामुळे उपलब्ध झाली आहे. 

कै. आनंदीबाई वामन खंडागळे-पुंडे यांच्या स्मरणार्थ गुरुकुल इंग्लिश माध्यमाच्या विद्यालयात आधुनिक अवकाश निरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्‌घाटन फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व्ही. के. वाघ व लायन्स क्‍लबचे गव्हर्नर (3234) ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी उपप्रांतपाल अभय शास्त्री, हेमंत नाईक, रामकृष्ण मठाचे स्वामी एकानंद, सहकार लायन्स क्‍लबच्या अध्यक्षा संध्या नारके, नवचैतन्याचे बिंदुमाधव मेंडजोगे, देवसंस्थानचे माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, डॉ. विशाल कुंभारे, प्राचार्य बाळासाहेब झगडे, प्रकाश नारके, विजय सोनवणे, डॉ. विपुल अभ्यंकर आदी उपस्थित होते. 

या वेळी डॉ. वाघ म्हणाले, ""नुसत्या डोळ्यांनी समोरचे दिसते; तर दुर्बिणीतून तारांगण जवळ आल्यासारखे वाटते.'' ""या अवकाश निरीक्षण केंद्राचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल व अवकाश शास्त्रज्ञ तयार होतील,'' असे मत ओमप्रकाश पेठे यांनी व्यक्त केले. गुरुकुल विद्यालय परिसराची जागा सप्तर्षी आश्रमाच्या परिसरातील असल्याने या अवकाश निरीक्षण केंद्रास "सप्तर्षी' असे नाव दिले असल्याचे डॉ. खंडागळे यांनी सांगितले. 

डॉ. कुंभारे यांनी अवकाश निरीक्षण केंद्रात विविध टेलिस्कोप, दुर्बीण, पुस्तके व अवकाश निरीक्षणासाठी असलेल्या साहित्याची माहिती दिली. डॉ. कुंभारे यांनी लिहिलेल्या "ओळख खगोलशास्त्राची' या पुस्तकाचे व डॉ. खंडागळे यांच्या हस्ते; तर "या चिमण्यांनो परत फिरा' या उपक्रमाचे ओमप्रकाश पेठे यांनी उद्‌घाटन केले. या अवकाश निरीक्षण केंद्राचा लाभ परिसरातील विद्यार्थी व शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब झगडे यांनी केले. 

या वेळी अभय शास्त्री, हेमंत नाईक, स्वामी एकानंद यांचीही भाषणे झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com