कारवाईनंतर रस्ता झाला मोकळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

पिंपरी - येथील महापालिका भवनासमोर बीआरटी मार्गात अनेक वाहनचालक सर्रास मोटारी लावत होते. परंतु वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनांवर कारवाई सुरू केल्याने या मार्गाने शुक्रवारी (ता. ११) मोकळा श्‍वास घेतला. 

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत वाहनांसाठी पार्किंग आहे. परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हे पार्किंग अपुरे पडू लागले. त्यामुळे महापालिकेत कामानिमित्त येणारे नागरिक, व्यावसायिक महापालिकेच्या इमारतीसमोर मुंबई-पुणे महामार्गावरही चारचाकी वाहने उभी करू लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने अशी वाहने उभी करण्यात येऊ लागल्याने सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या मार्गावर कोंडी होत असे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी बीआरटी मार्गिकेवर लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली. त्यामुळे या मार्गावर वाहने लावणे बंद झाले आहे. वाहतूक पोलिसांचे वाहन उभे असल्याचे पाहून या मार्गिकेवर वाहन लावण्यास धजावत नसल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: After the action the road free