...म्हणून 'त्या' महिलेने डोंगरावरुन उडी मारुन केली आत्महत्या

death11.jpg
death11.jpg
Updated on

वारजे (पुणे) :  नवऱ्याच्या निधनाचा धक्का सहन  न झाल्याने अवघ्या दहा दिवसातच पत्नीने डुक्कर खिंड येथील डोंगरावरून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. रविवारी सकाळी वारजे येथील डुक्कर खिंडीच्या दीडशे फूट डोंगरावरून एका महिलेने आत्महत्या केली होती. याचे गूढ उकलण्यात वारजे पोलिसांना यश आले आहे.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा सोमनाथ रणसिंग ( वय - 35, रा. बालेवाडी.  मुळगाव- आष्टी, जिल्हा- बीड ) ही महिला आपल्या पतीसह बालेवाडी येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होती. दहा दिवसापूर्वी या महिलेचे पती सोमनाथ रणसिंग यांना दारूचे व्यसन होते आणि या व्यसनांमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याची नोंद चतुश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहे. त्या अनुषंगाने वारजे पोलिसांनी चौकशी केली असता आत्महत्याग्रस्त महिलेची ओळख पटली. या महिलेला अकरा वर्षांची एक मुलगी तर  नऊ वर्षाचा एक मुलगा आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बालेवाडीमध्ये हे दोघे पती-पत्नी दोन मुलांसह राहत होते. मोलमजुरी करून आपली गुजराण करत होते. या महिलेच्या शेजारी तिचे आई- वडील राहतात.  त्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीचा मृतदेह ओळखला. नवऱ्याच्या निधनाने आशा रणसिंग या गेली दहा दिवस अस्वस्थ होत्या.  त्यामुळे त्या बालेवाडीवरून वारजेच्या दिशेने चालत येत असताना येथील डुक्कर खिंडीचा डोंगर पाहून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. फक्त फोटोच्या आधारे पोलिसांनी या आत्महत्याग्रस्त महिलेचा नातेवाइकांचा शोध लावला. अशी माहिती वारजे पोलीस स्टेशनचे अशोक येवले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com