पुण्यापाठोपाठ आता पिंपरीतही टोळक्‍यांची दहशत; 13 वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

राजेश कांबळे पहाटे इंद्रायणी थडी जत्रेतून घरी परत आले. त्या वेळी टेम्पो लावत असताना दबा धरून बसलेले पाच जण तेथे आले. त्यांनी कांबळे यांना धमकावून त्यांच्याकडील सोळाशे रुपये हिसकावून घेतले तसेच मारहाण केली. त्या वेळी कांबळे यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. दहशत माजविण्यासाठी या पाच जणांनी परिसरातील टेम्पो, रिक्षा अशा दहा ते बारा वाहनांच्या लोखंडी पाइपने काचा फोडल्या.

निगडी(पिंपरी) : अजंठानगर येथे पाच जणांच्या टोळक्‍याने एकाला रविवारी (ता. 2) पहाटे कोयत्याचा धाक दाखवून सोळाशे रुपये हिसकावून घेतले. संबंधित व्यक्तीने आरडाओरडा केल्यानंतर त्यांनी परिसरातील दहा ते बारा वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून, त्याच्या अन्य चार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. 

#PuneCrime : तळजाई वसाहतीत ५० गाड्यांची तोडफोड

राजेश पोपट कांबळे (रा. अजंठानगर) यांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित चंद्रकांत मुद्दे (पत्ता उपलब्ध नाही) असे या प्रकरणातील संशयिताचे नाव आहे.

पुण्यात टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; सहा गाड्यांची तोडफोड  

राजेश कांबळे पहाटे इंद्रायणी थडी जत्रेतून घरी परत आले. त्या वेळी टेम्पो लावत असताना दबा धरून बसलेले पाच जण तेथे आले. त्यांनी कांबळे यांना धमकावून त्यांच्याकडील सोळाशे रुपये हिसकावून घेतले तसेच मारहाण केली. त्या वेळी कांबळे यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. दहशत माजविण्यासाठी या पाच जणांनी परिसरातील टेम्पो, रिक्षा अशा दहा ते बारा वाहनांच्या लोखंडी पाइपने काचा फोडल्या. या घटनेची माहिती समजताच निगडी पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी पाच जणांविरुद्ध दरोडा आणि घातक शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After pune 13 Vehicle vandalisation at ajanta nagar pimpri