Success Story : निमोण्यातून ‘ड्रॅगन’ शेतीचा ‘अरुणोदय’

प्रधान यांच्याकडून दहा वर्षांत पाच लाखांहून अधिक रोपांची विक्री
After retiring from a bank at the age of 50 Arun Nilkanth Pradhan planted a dragon orchard at Nimone
After retiring from a bank at the age of 50 Arun Nilkanth Pradhan planted a dragon orchard at Nimonenitin bavarkar

शिरूर : बॅंकेतील नोकरीतून वयाच्या पन्नासाव्या वर्षी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर अरुण निळकंठ प्रधान यांनी निमोणे (ता. शिरूर) येथे ड्रॅगनची फळबाग फुलविली आहे. येथे त्यांनी फळांच्या विक्रीबरोबरच; दोन एकरांत कलमे विकसित करण्याचे काम होत असून, त्यांनी गेल्या दहा वर्षात १३ ते १५ हजार शेतकऱ्यांना तब्बल पाच लाखांहून अधिक रोपांची विक्री केली आहे.

प्रधान यांनी पुण्यात ‘बॅंक ऑफ इंडिया’तून सन २००० मध्ये पन्नासाव्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. शेतीची आवड जोपासता यावी म्हणून निमोणे गावाजवळ पाणी व विजेची चांगली उपलब्धता असल्याने तेथे नऊ एकर जमीन घेतली. तीन कामगारांच्या साहाय्याने ते शेती करतात. त्यांनी मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रूट पहिल्यांदा पाहिल्यावर इंटरनेटवर त्याची माहिती घेतली. कोलकत्यातील एका शेतातून कलमे खरेदी करून ती लावली. विदेशी फळाच्या लागवडीचा हा प्रयोग यशस्वी झाला असून, सध्या सुमारे सात हजार रोपे यशस्वीरीत्या उभी आहेत.

After retiring from a bank at the age of 50 Arun Nilkanth Pradhan planted a dragon orchard at Nimone
पुणे महापालिका रुग्णालयांसाठी ८०० रेमडेसिव्हिर

सद्यःस्थितीत मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या प्रधान यांनी सुरवातीच्या काळात स्वतः शेतीत कष्ट घेतले. त्या बळावरच या खडकाळ जमिनीत वैविध्यपूर्ण फळांच्या बागा बहरल्या आहेत. दुर्मिळातील दुर्मिळ आणि अनेक विदेशी फळांची लागवड त्यांनी केली असून, केवळ ठिबक सिंचनावर तब्बल २८ प्रकारच्या फळांची झाडे व बागा विकसित केल्या आहेत. त्यासाठी एक विहीर व दोन बोअरवरून नियोजन करून पाणी घेतले जाते. सर्व झाडांना जीवामृतदेखील ठिबकमधूनच दिले जाते.

येथे लाल व पांढरा गाभा, अशा दोन रंगात त्यांनी स्वतंत्रपणे ड्रॅगनची फळबाग केली असून, या विदेशी फळांची विक्री देखील ते स्थानिक पातळीवरच करतात. लागवडीनंतर दोन वर्षांनी तोड सुरू होऊन आत्तापर्यंत १५ वर्षात त्यांनी यशस्वी नियोजनातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. प्रत्येक वेलीपासून किमान चाळीस फळे मिळतात. एकरी सहा टन उत्पादन अपेक्षित असताना सुरवातीच्या काळात दहा ते बारा टनांपर्यंत उत्पादन मिळविले, असे प्रधान यांनी सांगितले.

After retiring from a bank at the age of 50 Arun Nilkanth Pradhan planted a dragon orchard at Nimone
गुदमरलेल्या पुण्यात व्हेंटिलेटर दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष

या फळ- फुलांचेही संशोधन

अरुण प्रधान यांच्या फळबागेत ड्रॅगन हे मुख्य पीक असून, हापूस, केसर जंबो, सिंधू, रत्ना, वनराज या देशी; तर लिली, माया, विलाय कोलंबन, टॉमी ऍटकिन्स, किट, केन्ट, हेगेन, हेडेन, पामर, नामडोकमाई या विदेशी आंब्याच्या जाती विकसित केल्या आहेत. चिकू, रायआवळा, सोनकेळी, नारळ, जांभूळ ही देशी; तर थायमलबेरी, वॉटर ऍपल, तैवान पेरू, जामुन ही विदेशी फळेही येथे मोठ्या प्रमाणावर दिसतात. जास्वंदाचे ११ प्रकार; तर नुलिनी ही शोभेची आणि सिट्रोनिला या औषधी वनस्पतीही ठिकठिकाणी डोकावतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com