सलग सुट्यांनंतर पैशांसाठी बॅंकांत गर्दी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पिंपरी - सलग तीन दिवसांच्या सुट्या संपल्यानंतर मंगळवारी (ता. 13) बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. चलन तुटवड्यामुळे बॅंकांकडून मात्र ठराविक रक्कमच दिली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दुसरा शनिवार, रविवारची साप्ताहिक सुटी आणि सोमवारी ईद-ए-मिलादनिमित्त असलेली सार्वजनिक सुटी यामुळे बॅंका सलग तीन दिवस बंद होत्या. त्यानंतर मंगळवारी सकाळी बॅंकांचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. त्यापूर्वीच नागरिकांनी बॅंकांबाहेर रांगा लावल्या होत्या. त्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांना तसूभरही उसंत मिळत नव्हती.

बॅंकांनी तीन दिवसांच्या सुटीच्या कालावधीतही एटीएममध्ये पैसे भरलेले नव्हते. त्यामुळे एटीएम सुरू मात्र, पैशांचा खडखडाट अशीच स्थिती होती. तीच परिस्थिती आजदेखील शहरात बऱ्याच ठिकाणी पाहण्यास मिळाली. बॅंकेत उपलब्ध रोकडनुसारच दररोज पैसे काढण्याची मर्यादा निश्‍चित केली जात असल्याने बॅंकानिहाय पैसे काढण्याच्या मर्यादेत दररोज वाढ किंवा घट होत आहे.

कॅशलेस खरेदीवर भर
तीन दिवस सलग बॅंका बंद असल्याने नागरिकांनी डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे; तसेच ऑनलाइन खरेदीवर भर दिला. तीच स्थिती आजदेखील पाहण्यास मिळाली. बॅंकांमधून अपेक्षित प्रमाणात रोकड मिळत नसल्याने कार्डद्वारे; तसेच यूपीआय, पेटीएम, मोबाईल वॉलेट अन्य पर्यायांचा वापर करून कॅशलेस खरेदी सुरू होती. काही मॉल्समध्ये डेबिट कार्ड स्वाइप करून कार्डधारकाला प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येत होते. त्यामुळे तेथेदेखील रांगा पाहण्यास मिळाल्या.

Web Title: After the rush of money in bank