नागरीकांनो, आज सूर्यास्तानंतर दिसणार बुध आणि शुक्राची युती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

सूर्यास्तानंतर पश्‍चिमेच्या क्षितिजावर बुध आणि शुक्राची युती  पाहण्याची दुर्मिळ संधी आपल्याला प्राप्त होणार आहे.  गुरुवारी (ता.21) संध्याकाळी ही विलोभनीय घटना पहायला मिळेल.  

पुणे - सूर्यास्तानंतर पश्‍चिमेच्या क्षितिजावर बुध आणि शुक्राची युती पाहण्याची दुर्मिळ संधी आपल्याला प्राप्त होणार आहे. गुरुवारी (ता.21) संध्याकाळी ही विलोभनीय घटना पहायला मिळेल. सूर्यास्तानंतर साधारणपणे एक ते सव्वा तासानंतर ही खगोलिय घटना दिसणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या वेळी पृथ्वीवरून बुध आणि शुक्र हे ग्रह एकमेकांपासून साधारणपणे एक अंश अंतरावर दिसतील.

खगोल अभ्यासक अमित पुरंदरे म्हणाले,""वास्तवामधे बुध ग्रह हा पृथ्वीपासून साधारणपणे 5 कोटी 79 लाख किलोमीटर तर, शुक्र ग्रह 10 कोटी 87 लाख किलोमीटर अंतरावर आहे. हे दोन्ही ग्रह पृथ्वीचे अंतर्ग्रह असल्यामुळे चंद्रा सारख्या कला दाखवितात. या कला नुसत्या डोळ्यांनी न दिसता त्या करिता दुर्बिणीचा वापर आवश्‍यक आहे.'' आकाश निरभ्र असल्यास या घटनेचे साक्षीदार सर्वांनाच होता येईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अशी पहा खगोलीय घटना -
- दोन्ही ग्रहांची युती डोळ्याने दिसणार 
- शुक्राची कला (कोर) पाहण्यासाठी 6 इंच व्यासाची दुर्बीण आवश्‍यक 
- बुध ग्रहाची युती पाहण्यासाठी कमीत कमी 10 इंच व्यासाची दुर्बीण आवश्‍यक 
- सुर्यग्रहणासारख्या जय्यत तयारीची आवश्‍यकता नाही 
- उत्तम कॅमेरा असल्यास खगोलिय घटनेचे

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After sunset you will see the union of Mercury and Venus on the western horizon

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: