Sharad Pawar: "म्हणून दोन पायाची लोकं रवींद्र धंगेकरांना मतदान करतील हे माहिती होत" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Sharad Pawar: "म्हणून दोन पायाची लोकं रवींद्र धंगेकरांना मतदान करतील हे माहिती होत"

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कसबा पेठेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतली. रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपचा हा पराभव हा खासदार गिरीश बापट आणि टिळकांना डावलून घेतलेल्या निर्णयामुळे झाला असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला असला तरी या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल याची खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खात्री नव्हती. खुद्द शरद पवार यांनीच याची माहिती दिली. पवारांना कसब्यात यश येणार नाही. असं का वाटलं? असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे

कसब्यात यश मिळेल असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण मला त्याची खात्री नव्हती. नारायणपेठ, सदाशिवपेठ आणि शनिवारपेठ हा भाजपचा गड आहे. त्यामुळे कसब्यात विजय होईल की नाही याची खात्री नव्हती. हे मुख्य कारण आहे. कसब्यात गिरीश बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनिधीत्व केलं होतं. ते लोकांमध्ये असायचे. त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध होते. पण भाजपशी संबंध नसलेल्यांशीही त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळेच त्यांचं लक्ष असलेला मतदारसंघ जड जाईल असं वाटत होतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.

तर आगामी काळात देखील तिन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. माझा प्रयत्न राहील की विधानसभा आणि लोकसभेसाठी तिन्ही पक्ष एकत्र राहतील असंही पवार पुढे म्हणाले आहेत. त्याचबरोबर लोकांना बदल हवा आहे. लोकांची इच्छा आहे की आम्हीं एकत्रित राहावे असं शरद पवार म्हणाले आहेत.

या पोटनिवडणुकीत महविकास आघाडी म्हणून सगळे काम करत होते. आमचा उमेदवार सगळ्यांना मान्य होता म्हणून तो निवडून आला असंही पवार पुढे म्हणालेत. तर पुढे ते म्हणाले की, कसबा पेठ भाजपचा गड आहे. खासदार गिरीश बापट यांनी तिथं प्रतिनिधित्व केलं. बापटांची गोष्ट वेगळी होती पण त्यांचे सर्वांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामूळेच हा मतदार संघ जड जाईल असं काही लोकं म्हणत होते पण तिथं बापट आणि टिळकांना डावलून निर्णय घेतले गेले त्याचा फटका भाजपला बसला असंही ते म्हणालेत.

तर रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, हा उमेदवार चार चाकीमध्ये फिरणारा नाही तर हा उमेदवार दुचाकीवर फिरणारा आहे म्हणून दोन पायाची लोकं याला मतदान करतील हे माहिती होतं असंही शरद पवार पुढे म्हणाले आहेत. धंगेकरांना यश मिळेल असं लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण माझ्या मनात शंका होती. परंतू शेवटी शेवटी गिरीश बापट यांच्या सल्ल्याने भाजपमध्ये निर्णय घेतले की नाही अशी शंका होती. त्यामुळेच बापट आणि टिळक हे नाराज असल्याची शक्यता होती. मात्र या उमेदवाराचे काम परिणामकारक ठरले असंही पवार म्हणाले.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, हा उमेदवार कधी चारचाकीत बसत नाही. सतत दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे दोन पायांवर चालणाऱ्या लोकांनी धंगेकरांना मते दिली. महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी लोंकानी एकत्र यायला हवे.

टॅग्स :Sharad Pawarpuneelection