अन् भोर अडकले काळोखात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

शहर आणि परिसरातील काही गावांना शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथून घेण्यात आलेल्या विद्युत पुरवठा मंगळवारी (ता. ६) रात्रीपासून पुन्हा खंडित झाला आहे.

भोर ः शहर आणि परिसरातील काही गावांना शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथून घेण्यात आलेल्या विद्युत पुरवठा मंगळवारी (ता. ६) रात्रीपासून पुन्हा खंडित झाला आहे.

शिंदेवाडी (ता. खंडाळा जि. सातारा) येथील महावितरणचे दोन खांब अतिवृष्टीमुळे पडल्याने हा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सदर खांबाच्या दुरुस्तीचे काम करीत आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

भोर शहर समवेत उत्रौली, वडगाव भोलावडे, सांगवी आणि विसगाव खोऱ्यातील गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. दरम्यान, भाटघर धरणाजवळील पावर हाउसमध्ये पुन्हा पाणी घुसल्याने दुरुस्तीचे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर अर्धवट टाकून बाहेर यावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: again bhor in darkness