Video : हिंजवडीत पुन्हा धावत्या बसला आग; प्रवासी सुखरूप

pune-bus-fire.jpg
pune-bus-fire.jpg

हिंजवडी : हिंजवडीत पीएमपीएलच्या बसला आज सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली होती. या प्रकारामुळे आयटीयन्स प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. हा प्रकार फेज थ्री गवारेवाडी येथील बस स्थानकाजवळ घडला. कोणतीही जीवितहनी झाली नसून प्रवासी सुखरुप आहेत.

पीएमपीएलच्या ताफ्यात नव्याने आलेल्या सीएनजी बसला आग लागल्याने नागरिकांसह प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. फेज थ्री वरून निगडीला जाणारी ही बस होती. तांत्रिक बिघाडामुळे बसमधून अचानक धूर निघू लागल्याने चालकासह प्रवासी खाली उतरले. आगीमुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. आग लागलेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हिंजवडी अग्निशामक दलाच्या पथकाने अवघ्या दहा मिनिटात आग विझवली.

इंजिनमधील बिघाडामुळे आग लागली असावी असा अंदाज चालकांनी व्यक्त केला. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवाशी सुखरूप खाली उतरवले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com